सांगली जिल्ह्यातील शिगाव (ता. वाळवा) येथील कौस्तुभ राजेंद्र बारवडे हा अवघा २१ वर्षांचा तरुण घरची सहा एकर शेती समर्थपणे सांभाळतो आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेले शिगावचे शिवार म्हणजे वारणा नदीच्या पाण्याने समृद्ध असा उसाचा हुकमी पट्टा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी बारवडे यांच्या संयुक्त कुटुंबाची सुमारे सहा एकर शेती आहे.
लहान वयात पेलली जबाबदारी खरे तर नवी पिढी नोकरी किंवा शेतीव्यतिरिक्त अन्य व्यवसायाच्या मागे लागली आहे असे म्हटले जाते. इथे तर बारवडे कुटुंबातील नव्या पिढीचा कौस्तुभ सारी शेती घरातील अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली समर्थपणे सांभाळतो आहे. त्याचे वडील राजेंद्र बॅंकेत तर चुलते सुकुमार साखर कारखान्यात नोकरी करतात. सर्जेराव हे अन्य चुलते हयात नाहीत. कौस्तुभचे टेक्सटाईल विषयातील डिप्लोमापर्यंत शिक्षण झाले आहे. त्याचे वय अवघे २१ वर्षे आहे. मात्र सुरवातीपासून शेतीचीच आवड व त्यात नवीन काही करण्याचा ध्यास त्याने बाळगला आहे.
परदेशी भाजीपाला लागवड कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे येथील नातेवाइकांकडे कौस्तुभने परदेशी (एक्झॉटिक) भाजीपाला लागवडीची शेती पाहिली. त्याबाबत अधिक अभ्यास केला. या पिकांचा प्रयोग आपणही करावा असे त्याने निश्चित केले. त्यासाठी वडीलधारी मंडळींचा सल्लाही घेतला. नातेवाइकांचे मार्गदर्शन घेत सुमारे चार वर्षांपूर्वी झुकेनी पिकापासून वेगळ्या वाटेचा श्रीगणेशा केला. सुरवातीला समस्याही आल्या. पण त्यांची सोडवणूक करीत हा प्रयोग यशस्वीही केला.
पीक नियोजन कौस्तुभ सांगतो, की नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात परदेशी भाजीपाल्याला फार मार्केट नसते. या काळात पर्यायी उत्पन्नस्रोत बेसील पीक असते
बेसीलचा उपयोग बेसील ही तुळसवर्गीय औषधी वनस्पती आहे. त्याला चांगला सुगंध आहे. हर्बल टी तयार करण्यासाठी त्याची पाने वापरली जातात. अन्य भाज्यांमध्ये स्वाद येण्यासाठी बेसीलचे महत्त्व आहे. यंदा झुकेनीची काढणी केल्यानंतर तण काढून जमीन चांगली तयार केली. पूर्वीच्या पॉलिमल्चिंगवर च बेसीलची रोपे लावली. त्यामुळे मल्चिंगचा खर्च वाचला.
कुटुंबातील उच्चशिक्षित तरुणाई शिगावात बारवडे यांचे राजेंद्र, सुकुमार, सर्जेराव या तीन भावांचे एकत्रित कुटुंब आहे. कौस्तुभ टेक्सटाईल पदविकेव्यतिरिक्त दुरस्थ शिक्षणपद्धतीनुसार बी.कॉमचे शिक्षणही घेत आहे. कुटुंबातील अवधूत हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. धनाजी एमई (मेकॅनिकल) असून प्राध्यापक आहेत. संतोष डीफार्मसी आहे.
ज्ञान व प्रशिक्षण परदेशी भाजीपाला शेती या भागात पहिल्यांदाच असल्याने लागवडीपासून ते काढणीपर्यंत फारशी माहिती या कुटुंबाला नव्हती. कौस्तुभ यांनी नातेवाइकांकडून त्याबाबत ज्ञान घेतले. तसेच मजुरांना प्रशिक्षण दिले. आता मजूरही या शेतीत कुशल झाले आहेत. मार्केट
मिळणारे दर (प्रति किलो)- वार्षिक
कौस्तुभ यांच्या परदेशी भाजीपाला शेतीची वैशिष्ट्ये
सध्याची शेती दृष्टिक्षेपात
प्रतिक्रिया तरुणांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीची संधी शोधत असतानाच घरच्या शेतीत वेगळे करण्यावर भर द्यावा. सातत्य ठेवल्यास त्यात यश हमखास मिळते. कौस्तुभ बारवडे - ९०११९२३९९५
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.