Farm Electricity: धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा असताना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात उपसाबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला तीव्र विरोध करत वीजकपात आणि उपसाबंदी तातडीने मागे न घेतल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील महावितरण व जलसंपदा विभागाच्या कार्यालयांसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. .तसेच साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांची वीज आणि पाणी रोखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शेट्टी म्हणाले की, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रमुख धरणे सध्या पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. परतीचा पाऊसही पुढील काळात सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असताना तातडीने उपसाबंदी लागू करण्याची गरज काय, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला..Raju Shetti: धरणे १०० टक्के भरलेली, सांगली-कोल्हापुरात उपसाबंदीची गरज काय? राजू शेट्टींचा सवाल.उपसाबंदी लागू करण्यापूर्वी पुढील वर्षाचे पाणी नियोजन करून ते जनतेसमोर मांडणे आवश्यक असल्याचे सांगत, जलसंपदा विभागाकडे असे नियोजनच नसल्याचा दावा त्यांनी केला. महावितरणकडून शेती पंपांची वीजकपात आणि जलसंपदा विभागाकडून उपसाबंदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना कोंडीत पकडले जात आहे..Sugarcane Crushing Season: यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून, सरकारचा निर्णय, पण साखर उतारा घटणार?.राज्यात मुबलक वीज उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री सांगत असताना शेतीपंपांचे दररोज दोन-दोन तास भारनियमन का केले जात आहे, असा प्रश्न शेट्टी यांनी केला. केंद्राने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकरी आणि साखर कारखानदारांसाठी अडचणीचा ठरत असताना राज्य सरकारकडून प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून शेतकऱ्यांवर दबाव आणला जात आहे..‘नुकसान भरपाईनंतरच कारखाने सुरू करावेत’१५ ऑक्टोबर ही उसाच्या परिपक्वतेच्या दृष्टीने लवकरची तारीख आहे. लवकर तोडणी केल्यास उसातील साखरेचा उतारा कमी होण्याबरोबरच वजनातही शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम कारखान्यांच्या आर्थिक गणितावर आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एफआरपीवर होऊ शकतो. १५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करायचे असतील, तर शेतकऱ्यांना प्रति टन ५०० रुपये नुकसान भरपाई द्यावी, त्यानंतरच कारखाने सुरू करावेत, अशी मागणीही त्यांनी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.