द्राक्षबागेत वाढीसाठी पोषक वातावरण
द्राक्षबागेत वाढीसाठी पोषक वातावरण 
फळबाग

द्राक्षबागेत वाढीसाठी पोषक वातावरण

डॉ. आर. जी. सोमकुंवर

गेल्या २-३ दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये सर्वत्र पाऊस दिसत आहे. त्याचे प्रमाण कमी अधिक असले तरी ढगाळ वातावरण मात्र सर्वत्र दिसत आहे. यामुळे तापमानात मोठी घट झाली असून, आर्द्रतासुद्धा वाढली आहे. या सर्व वातावरणातील घटकांमुळे द्राक्षबागेत वेलीच्या वाढीकरिता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचे काही फायदे आणि तोटेही आहेत. तोटे कमी करताना अधिक फायदे कसे मिळवायचे, याविषयी लेखात माहिती घेऊ. १. नवीन बाग ः-

  • या बागेत वेलीवर फलधारीत काडीसुद्धा काही प्रमाणात तयार झाली असेल. यापूर्वी बागेत जास्त प्रमाणात तापमान व त्या सोबत पाण्याची कमतरता असल्यामुळे वेलींची वाढ समाधानकारक झालेली नाही. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता होती, अशा बागेत ओलांड्याचा पहिला टप्पा कसातरी पूर्ण झाला असेल. कशाबशा ४-५ काड्या त्यावर वाढवता आल्याचे चित्र आहे.
  • आता ओलांड्याचा दुसरा टप्पा तयार होण्याकरिता पोषक असे वातावरण बागेत तयार झाले आहे. पहिल्या वर्षीच्या बागेत फळ छाटणी ही ऑक्‍टोबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेता येते. अशा परिस्थितीत ओलांडा पुन्हा वाढवून तितक्‍याच काड्या तयार करता येतील. फळ छाटणीस बराच वेळ असल्यामुळे फलधारीत काडी तयार करता येईल. तेव्हा ओलांड्यावरील शेवटची फूट पुन्हा तारेवर बांधून घ्यावी. ओलांड्यावर तयार झालेल्या काड्यावर मात्र या वेळी फूट येणार नाही, याची काळजी घ्यावी. ओलांड्यावर बांधलेल्या फुटीवर निघालेल्या बगल फुटी ४-५ पाने अवस्थेत खुडून घ्याव्यात. या फुटीवर निघालेल्या बगलफुटी ३-४ पानांच्या अवस्थेत ६-बीए १० पीपीएम व युरासील २५ पीपीएम या प्रमाणात फवारणी करावी. पुढील काळात पाऊस किंवा पावसाळी वातावरण असेल, तर वेलीच्या वाढीचा जोम जास्त राहील. वाढीसाठी अशा फांदीवर मोनोपोटॅशिअम फॉस्फेट (०ः५२ः३४) किंवा सल्फेट ऑफ पोटॅश (०ः०ः५०) २-३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे अधूनमधून फवारणी करावी.
  • २. जुनी बाग ः वाढीकरिता झालेल्या पोषक वातावरणामुळे जुन्या बागेतील आता वेलीचे शेंडे वाढायला सुरवात होईल. याच सोबत बगलफूटसुद्धा निघेल. म्हणजेच कॅनॉपीची दाटी या वेळी पहावयास मिळेल. ज्या बागेत सतत २-३ दिवस पाऊस झाला असेल, तिथे या दाट कॅनॉपी व कोवळ्या फुटींवर करपा, डाऊनी मिल्ड्यू व करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असेल. यापूर्वी रोगांचा प्रादुर्भाव असल्यास त्यांचे जिवाणू/बिजाणू सुप्तावस्थेत राहिलेले असतात. ते आता कार्यान्वित होते. अशा बागेत खालील प्रकारे व्यवस्थापन करावे.

  • शेड पिंचिंग करणे.
  • बगलफुटी कमी करणे.
  • पावसानंतर नवीन व उशिरा निघत असलेल्या फुटी काढून टाकणे.
  • आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करणे.
  •  रोगाची नुकतीच सुरुवात झालेल्या परिस्थितीत स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी करणे.
  • यावेळी काडी जुनी होत आहे. ज्या ठिकाणी काडी तळातून दुधाळ रंगाची झाली, अशा बागेत बोर्डो मिश्रणाची अर्धा टक्के प्रमाणे फवारणी सुरू करता येईल.
  • बऱ्याच बागेमध्ये यावेळी काडी परिपक्वतेची अवस्था असेल. अशा अवस्थेत काडीवर रिंग तयार झालेली असेल. काही परिस्थितीमध्ये काडीवरील एक पेरा तपकिरी रंगाचा दिसेल. तर दुसरा पांढरा व पुन्हा तिसरा पेरा तपकिरी दिसेल. यालाच इर्ग्यूलर केन मॅच्युरिटी (अनियमित काडी पक्वता) असे म्हटले जाते.
  • एप्रिल, मे महिन्यात वाढत्या तापमानात व कमी पाणी उपलब्ध असलेल्या अवस्थेत वेलीवर ताण पडतो. अशी ताणाची स्थिती असताना वेलीवर बोट्रीडिप्लोडिया नावाची बुरशी हल्ला करते. जिथे अशी स्थिती असेल तिथे शिफारशीनुसार कॉपरयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • टीप ः बुरशीनाशकांचा वापर करताना विविध देशांच्या मागणीनुसार त्यांचे एमआरएल व पीएचआय तपासावेत. त्यानंतरच शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा वापर एनआरसीच्या सल्ल्यानुसार करावा.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

    Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

    Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

    Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

    Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

    SCROLL FOR NEXT