लिंबूवर्गीय फळपीक सल्ला
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला 
फळबाग

लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

- डाॅ एम. एस. लदानिया, दिनकरनाथ गर्ग

गेल्या काही वर्षांमध्ये मोसंबीसह लिंबूवर्गीय बागांचा ऱ्हास होत आहे. यामागे सिंचन व्यवस्थापन, कीड- रोगांचे वेळेवर नियंत्रण न होणे यासारखी कारणे दिसून येत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून हळूहळू तापमानात वाढ होत जाते. या काळात लिंबूवर्गीय फळबागांमधील व्यवस्थापनाविषयी माहिती घेऊ. सिंचन व्यवस्थापन ः

  • या वेळी झाडावर नवती असते. तसेच अांबिया बहराची फुले व फळधारणाही याच काळामध्ये होते. फेब्रुवारी महिन्यापासून हळूहळू उष्णतामानामध्ये वाढ होत जाते. या काळात सिंचनाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
  • जमिनीनुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने नियमित पाणी द्यावे. ठिबक सिंचन संच असल्यास १ ते ४, ५ ते ७ आणि ८ वर्षांवरील झाडांना अनुक्रमे ९ ते ४० लिटर, ६० ते ९६ लिटर व १०८ ते १३७ लिटर पाणी प्रति दिवस द्यावे.
  • डिंक्या रोग व्यवस्थापन ः

  • झाडांच्या बुंध्यावर डिंक्याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, असा भाग चाकूने खरवडून काढावा. त्यावर मेटॅलॅक्झील एम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटील एएल यांची पेस्ट लावावी.
  • आंबिया बहरातील फळगळ रोखण्यासाठी, जिबरेलिक अॅसिड १.५ ग्रॅम अधिक युरिया एक किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • मृग बहर व्यवस्थापन

  • या महिन्यात मृग बहराची फळे काढण्याच्या स्थितीमध्ये असतील. योग्य पक्वतेला फळ तोडून बाजारामध्ये विक्री करावी.
  • फळे तोडणीनंतर झाडावरील सल काढून टाकावी. झाडावर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा काॅपर आॅक्सिक्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • कीड व्यवस्थापन

  •  खोडकिडा किंवा ईंदरबेला ः या साल खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, अळीच्या छिद्रावरून जाळे काढून त्यामध्ये    इंजेक्शनच्या साह्याने शिफारशीत कीडनाशकाचे द्रावण टाकावे. कापसाचा बोळा या द्रावणात बुडवून छिद्रावर लावावा.
  •  पाने पोखणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी सायपरमेथ्रीन (१० ई.सी.) २ मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन (२५ ईसी) १ मि.लि.
  •  मावा नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी डायमेथोएट १.५ मि.लि.
  •  पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी सायपरमेथ्रीन (१० ई.सी.) २ मि.लि. किंवा डायमेथोएट १.५ मि.लि.
  •   अांबिया बहराच्या वेळी सिट्रस सायला नियंत्रणाकरिता, फवारणी प्रति लिटर पाणी इमिडाक्लोप्रिड ०.५ मि.लि. किंवा क्विनाॅलफाॅस १.५ मि.लि. किंवा डायमेथोएट २ मि.लि. किंवा नोव्हॅल्युराॅन ०.८० मि.लि. आवश्यकता भासल्यास वरीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी, परंतु कीटनाशक बदलून वापरावे.

    संपर्क  ः डाॅ. एम. एस. लदानिया (संचालक), ०७१२-२५००३२५  दिनकरनाथ गर्ग, कीटकशास्त्रज्ञ, ९८२२३६९०३० (केंद्रिय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

    Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

    Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

    Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

    Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

    SCROLL FOR NEXT