health benefits of cumin
health benefits of cumin 
औषधी वनस्पती

महौषधी जिरे

विनीता कुलकर्णी

स्वयंपाकात, पदार्थात, मसाल्यात उपयुक्त असणारे जिरे सर्वांनाच परिचित आहे. पदार्थाला चव येण्यासाठी जिरे वापरले जाते. पण औषध म्हणून जिरे उत्तम कार्य करते, हे फार कमी लोकांना माहिती असते.

  • अत्यंत रुचकर आणि पाचक म्हणून जिरे काम करते. अजीर्ण अपचन यांवर अर्धीवाटी गोड ताकात जिरेपूड घालून जेवणामध्ये ताक प्यावे.
  • काही वेळा तिखट खाल्ल्याने पोट बिघडते. यामध्ये पोट दुखते आणि चिकट शौचाला होते. अशावेळी जिरेपूड गरम पाण्यासह घ्यावी. तसेच बडीशेप आणि जिरे १/४ चमचा प्रत्येकी घेऊन पाण्यात उकळावे व हे पाणी दिवसभर घ्यावे.
  • लहान मुलांना जंत होतात. त्यांना १ ग्रॅम जिरेपूड, १ ग्रॅम वावडिंग गुळासह दिल्यास उपयोग होतो.
  • स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरे जाण्याची तक्रार असते. पाळीच्या दिवसातही खूप त्रास होतो. अशावेळी जिरेपूड, खडीसाखर तांदळाच्या धुवणासह दिल्यास फायदा होतो. तांदूळ ४ ते ५ धुवून जे पाणी राहते, त्यास तांदळाचे धुवण म्हणतात.
  • धने-जिरे यांची पावडर साखरेसह घेतल्यास पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.
  • अंगात साठलेली उष्णता आणि कडकी यांवर जीऱ्याचा चांगला उपयोग होतो.
  • गर्भवती महिलांसाठी तयार केलेल्या पदार्थांत जिऱ्याचा समावेश जरूर असावा. अन्नपचन सुधारते आणि अंगावरचे दूधही बाळाला पचण्यास हलके बनते. शिवाय उष्णताही कमी होते.
  • जेवणानंतर गॅसेसमुळे पोट जड होत असेल तर जिरे आणि ओवा चावून घ्यावे. उपयोग होतो.
  • पथ्य

  • जड, शिळे अन्न खाणे, अवेळी जेवण करणे, भुकेच्या वेळी चहा किंवा कॉफी घेणे टाळावे.
  • तिखट, तळलेले पदार्थ, मेथी, हिरव्या मिरचीचा ठेचा, सिमला मिरची, पापड, लोणचे यांचे सेवन कमी ठेवावे. ज्यामुळे पित्त होणार नाही.
  • दोन जेवणांमध्ये किमान ३ ते ४ तासांचे अंतर जरूर असावे. ज्यामुळे गॅसेस होणार नाहीत.
  • काळजी  वारंवार पोटदुखी, जुलाब, आव होत असल्यास योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात. नियमित औषधे घ्यावीत. संपर्क - डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

    Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

    Beed Lok Sabha : बीडमध्ये ५५ वैध उमेदवार; छाननीअंती १९ उमेदवार बाद

    Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

    Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

    SCROLL FOR NEXT