What is importance of clean milk production? 
कृषी पूरक

दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी दुधाची प्रत ठरते महत्त्वाची

जनावरांची धार काढल्यानंतर बाहेरून दुधात अनेक सुक्ष्मजंतूंचा शिरकाव होत असतो. दूध काढल्यानंतर ते दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण केंद्र, दूध संघ ते ते दूध प्रक्रिया केंद्र या सर्व मार्गाने दूध प्रक्रिया केंद्रावर येत असते.

टीम अॅग्रोवन

जनावरांची धार काढल्यानंतर बाहेरून दुधात अनेक सुक्ष्मजंतूंचा शिरकाव होत असतो. दूध काढल्यानंतर ते दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण केंद्र, दूध संघ ते ते दूध प्रक्रिया  (milk processing) केंद्र या सर्व मार्गाने दूध प्रक्रिया केंद्रावर येत असते. हा पूर्ण कालावधी हा ४ ते ६ तासांचा असतो. या काळात दुधातील जीवाणूंच्या (bacteria) संख्येत वाढ होऊन दुधाची प्रत कमी होते.  हेही पाहा-  स्वच्छ दूध उत्पादन- आजची गरज

दुधाचे संकलन, प्रक्रिया आणि विक्री या दुग्धव्यवसायातील महत्त्वाच्या तीन पायऱ्या आहेत. आपल्याकडे गायी-म्हशींचे दूध दिवसातून दोन वेळेस काढले जाते. त्यामुळे दुधाचे संकलन दिवसातून दोन वेळा झाले पाहिजे. दुधाचे दर हे दुधातील स्निग्धांश (fat) आणि स्निग्धांशविरहीत (SNF) घटक यांवर अवलंबून असतात.

धार काढताना कितीही स्वच्छता (clean) ठेवली तरी, काही प्रमाणात दुधात जीवाणू येत असतात. आपल्या देशातील उष्ण दमट वातावरणामुळे दुधातील जीवाणूंची संख्या झपाट्याने वाढत असते. कच्चे दूध कोणत्या प्रतीचे आहे त्यावरूनच दुधापासून बनणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांची प्रत ठरत असते. आपल्याकडे दुधाचे उत्पादन हे बहुतांश ग्रामीण भागात होत असते. वाहतुकीमुळे या दुधाची प्रत खालावण्याची शक्यता अधिक असते.  या सर्व कारणामुळे दुधाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याची गरज असते.

दूध संकलन केंद्रावर दुध स्वीकारण्यापूर्वी दुधाच्या प्लॅटफार्म टेस्ट (Platform Test) केल्या जातात. या टेस्ट वरून दुधाची स्वीकारार्ह प्रत ठरवली जाते.  

general

general

general

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation Issue: राज्यातील ८३ हजार शेतकऱ्यांना फटका

Sugarcane Crushing Season: ऊस गाळप हंगाम लवकर सुरू केल्यास टोकाचा संघर्ष : राजू शेट्टी

Milk Price Hike: दुधाच्या खरेदीदरात सणासुदीमुळे तेजी

Rain Forecast: विदर्भ, मराठवाड्यात विजांसहजोरदार पावसाची शक्यता

Farmer Compensation: शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार, महसूलमंत्री बावनकुळे यांची माहिती

SCROLL FOR NEXT