Dairy Farmers: राज्यातील दुष्काळी स्थिती, तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांना सणासुदीच्या काळात असलेल्या वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांकडील गाय व म्हशीच्या दूध खरेदी दरात वाढ झाली आहे..राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झालेला आहे. पावसाचा दीर्घ खंड राहिल्यामुळे दुभत्या जनावरांच्या चाऱ्याची टंचाई काही भागात तयार झाली आहे. चारा महागला असून, त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्चही महागला आहे. दुसऱ्या बाजूला दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या दक्षिणेतील कर्नाटक, तमिळनाडू तसेच उत्तरेतील गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कमी पाऊस आहे. त्यामुळे देशभरातून दुधाचा पुरवठा मर्यादित होत असून त्याचा परिणाम दुधाचे खरेदी दर तेजीत ठेवण्यावर होतो आहे..Milk Price Hike: तामिळनाडूत दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दूध खरेदी दरात पुन्हा ३ रुपयांची वाढ.‘सोनाई’चे डेअरीचे संचालक दशरथ माने म्हणाले, ‘‘श्रावणात डेअरी उत्पादनाच्या बाजारपेठांमध्ये वाढलेली मागणी, पुढेही सणासुदीमुळे चांगली मागणी राहण्याचा अंदाज आणि मिठाईसह तूप व लोण्याच्या वाढत्या मागणीमुळे डेअरी क्षेत्राला दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर देणे शक्य झालेले आहे. सध्या तेजीमुळे गाय दुधासाठी शेतकऱ्यांना प्रति लिटर ३८-३९ रुपयांवरून ४१ रुपयांपर्यंत खरेदी दर मिळतो आहे. मात्र राज्य व राज्याबाहेरील दुष्काळाची वाटचाल पुढे कशी राहते यावर दूध दरातील तेजी निश्चित होत राहील.’’.दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी (कात्रज) दूध संघाकडून दूध खरेदी दरात प्रति लिटर १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. कात्रजचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी सांगितले, की दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी, दुग्ध व्यवसायातील वाढता उत्पादन खर्च तसेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी खरेदी दर वाढविल्यामुळे शेतकऱ्यांच्या सहकारी दूध सोसायट्यांना आता वरकड खर्चासह जादा रक्कम मिळेल. आता गाय दुधाला (३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी) प्रति लिटर ४०.८० रुपये प्रति लिटर दर मिळेल. तर म्हैस दुधाकरिता ६ फॅट व ९ एसएनएफसाठी) ५४ रुपये दिले जाणार आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच भेसळमुक्त व उच्च दर्जाच्या दुधाचा पुरवठा वाढावा यासाठी ही दरवाढ आहे. मात्र विक्रीदरात वाढ करून ग्राहकांवर बोजा टाकण्यात आलेला नाही..Cow Milk Price Hike: तमिळनाडूमध्ये गाय दूध खरेदी दरात ३ रुपयांची वाढ; प्रति लिटर ४१ रुपये दर मिळणार.ॲनालॉग पनीरवर बंदी फायदेशीर ठरलीदुधाऐवजी तेलापासून तयार होत असलेल्या ॲनालॉग पनीरवर बंदी घातली जात आहे. त्याचा फायदा दुधापासून तयार होत असलेल्या अस्सल पनीरच्या बाजारपेठेला होतो आहे. सध्या महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि कर्नाटकने कृत्रिम किंवा ॲनालॉग पनीरच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. राज्यात आता दुधाच्या पनीरचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने दूध मागणीत आपोआप वाढ झाली. त्यामुळे ॲनालॉग पनीरवरील बंदी शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडल्याचे डेअरी उद्योगाचे म्हणणे आहे..राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडील गाय दुधाच्या खरेदी दरात १ ते २ रुपयांची; तर म्हैस दुधाच्या खरेदी दरात ४ ते ५ वाढ झाली आहे. त्यामुळे गाय दुधाला प्रति लिटर ४१ रुपये व म्हैस दुधाला ५८ रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. ही तेजी दिवाळीपर्यंत टिकून राहण्यास अनुकूल स्थिती आहे.प्रकाश कुतवळ, सचिव, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.