Maharashtra Weather Update: राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. ११) मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ९.४ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जम्मूपासून, डेहराडून, फतेहगढ, प्रयागराज, अंबिकापूर, झारसुगुडा, कमी दाबाचे केंद्र, ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत होता..Vidarbha Rain Alert: विदर्भात वाढणार पावसाचा जोर.रायलसीमापासून मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. सौराष्ट्र आणि परिसरावर ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. यातच हरियाना आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे..गुरुवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर आणि यवतमाळ येथे राज्यातील नीचांकी १७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे सर्वाधिक ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात पावसाने ओढ दिली असून, ऊन-सावल्यांचा खेळात हलक्या सरी कोसळत आहेत. कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे..Maharashtra Monsoon Forecast: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता.राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, आज (ता. ११) विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर नाशिकचा घाटमाथा, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामान, ऊन-सावल्यांच्या खेळात विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..जोरदार पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : चंद्रपूर, गडचिरोली.विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : नाशिक घाटमाथा, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.