पशुपालन व्यवसायापैकी एक व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन. कोणताही व्यवसाय म्हटला की त्याबाबत समज गैरसमज आलेच. पण कुक्कुटपालन करताना रोगाचे नियंत्रण केलं म्हणजे हा व्यवसाय यशस्वी झालाच समजा. रोग नियंत्रण करायचे म्हणजे सुरुवातीला कोंबड्यांना कोणत्या वयात कोणत्या रोगाची बाधा होऊ शकते, त्या रोगाची लक्षणे कोणती आहेत, याची माहिती असल्यास रोगनिदान करणे सोयीचे जाते. म्हणजेच व्यवसाय सुरु करण्याआधी त्यासंबंधी प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे. ही प्राथमिक माहिती आपणांस प्रशिक्षणातून मिळू शकेल. व्यावसायिक दृष्ट्या पशुपालन करायचे असल्यास प्रशिक्षण हे घेतलेच पाहिजे.
हेही पाहा -कोंबड्यांना कोणती लस द्यावी?
प्रशिक्षण देणाऱ्या संस्था- - मध्यवर्ती अंडी उबवण केंद्र, खडकी, पुणे - मध्यवर्ती अंडी उबवण केंद्र, कोल्हापूर - सधन कुक्कुट विकास प्रकल्प येथे आठ दिवसांचे प्रशिक्षण आयोजित केल जातं. - जिल्हा उद्योग प्रकल्प आणि त्याअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र - मिटकॉन संस्था - सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट संस्था, गोरेगाव, मुंबई - इतर बिगर शासकीय संस्थामार्फतही प्रशिक्षण दिले जाते.
हेही पाहा-चांगल्या प्रतीच्या पिल्लांची उपलब्धता
कुक्कुटपालन व्यवसायात रोगाची बाधा झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक लसीकरण करणं केव्हाही फायद्याचे ठरते. आणि नेमक प्रशिक्षणात हेच शिकविलं जातं. हा व्यवसाय अंड्यासाठी म्हणजे लेअर, मांसासाठी ब्रॉयलर, सुधारित देशी कोंबड्याचे संगोपन, हॅचरीचा व्यवसाय. हेतुनुसार पक्षांचा प्रकार बदलत असतो, त्याप्रमाणे खाद्यात देखील बदल होत असतो. पक्षी पाळण्याचा कालावधी बदलत असतो. पक्ष्यांसाठी लागणारे औषध, लसी या सर्व गोष्टी विस्ताराने प्रशिक्षणात शिकविल्या जातात. एखाद्या प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष भेट देऊन सर्व प्रात्याक्षिके दाखविली जातात. कुक्कुटपालन व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण घेऊन अनेक समज, गैरसमज दूर होऊन व्यवसाय उत्तम करण्यासाठीचा आत्मविश्वास तयार होतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.