Poultry Feed Agrowon
कृषी पूरक

कसे टाळाल कोंबड्यांतील बुरशीजन्य आजार ?

सध्याच्या पावसाळी वातावरणात व दमट हवामानात कोंबड्याच्या खाद्याला बुरशी लागण्याची शक्यता असते.

Team Agrowon

सध्याच्या पावसाळी वातावरणात व दमट हवामानात कोंबड्याच्या खाद्याला (Poultry Feed) बुरशी लागण्याची शक्यता असते. अफ्लाटॉक्झिन व ऑकराटॉक्झिन अशा दोन प्रकारच्या बुरशी खाद्यामध्ये तयार होतात. असे बुरशीजन्य खाद्य (Fungal Feed) खाल्ल्यामुळे कोंबड्यांमध्ये विषबाधा होते. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील तज्ज्ञांनी बुरशीजन्य आजाराची लक्षणे आणि प्रतिबंध कसा करायचा याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊया.

कुक्कुटपालनात खाद्यावर ७५ ते ८० टक्के खर्च होतो. कोंबड्यांतील मरतुकीच्या अनेक कारणांपैकी बुरशीमुळे विषबाधा होणे हे एक कारण असून, या आजारांमध्ये इतर आजारांच्या तुलनेत जास्त प्रमाणात मरतूक आढळून येते. खाद्यातील अचानक बदल व ओलावा बुरशीच्या वाढीस कारणीभूत ठरतो. पावसाळा व हिवाळा ऋतूमध्ये खाद्यामध्ये बुरशी तयार झाल्यामुळे कोंबड्यांमध्ये विषबाधा आढळून येते. खाद्य आणि त्यातील घटक बुरशीच्या वाढीस आणि त्यांचे विष तयार करण्यास अनुकूल असतात.

काय आहेत लक्षणे
कोंबड्यांमध्ये अफ्लाटॉक्झिन व ऑकराटॉक्झिन बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कोंबड्यांना पांढऱ्या रंगाची हगवण होणे, कोंबड्यांची वाढ कमी होणे तसेच रोगप्रतिकार शक्ती कमी होउन इतर रोगांना बळी पडणे इ. लक्षणे दिसून येतात.

प्रतिबंध कसा करायचा ?
विषबाधेवर प्रतिबंधक उपाय म्हणून कुक्कुट खाद्यामध्ये ओलावा किंवा बुरशीची वाढ झाली नाही ना, याची खात्री करावी. खराब व ओलसर झालेले धान्य खाद्यात वापरू नये.
खाद्यांची साठवण जमिनीच्या वर एक ते दीड फूट उंचावर करावी.
खाद्य हे जीवाणू, विषाणू, बुरशी आणि विषारी घटक आणि निरुपयोगी घटकांपासून मुक्त असावे.
खाद्य जास्त कालावधीसाठी साठवून ठेवू नये, त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ देऊ नये.
खाद्य कोरड्या जागेवर व सभोवताली हवा खेळती राहील अशा ठिकाणी साठवून ठेवावे.
खाद्यगृहामध्ये उंदीर, घुशी, पक्षी, कुत्रे जाणार नाही याची काळजी घ्यावी.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी खाद्यामध्ये बदल करून कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन करावे.
कोंबड्यांना खाद्य देताना ते सांडणार नाही याची काळजी घ्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT