Method of fish salting 
कृषी पूरक

मासे खारवून टिकवण्याची पद्धत

मासे खारवून टिकविणे ही स्वस्त आणि पारंपरिक पद्धत आहे. समुद्रातून पकडलेले मासे किनाऱ्यावर आणल्याबरोबर लगेचच समुद्राच्याच स्वच्छ पाण्यात धुवून त्यावरची घाण, चिकटपणा काढला जातो. त्यानंतर हे मासे फिश क्युअरिंग यार्डात नेण्‍यात येतात

टीम अॅग्रोवन

समुद्रातून पकडलेले मासे किनाऱ्यावर आणल्याबरोबर लगेचच समुद्राच्याच स्वच्छ पाण्यात धुवून त्यावरची घाण, चिकटपणा काढला जातो. त्यानंतर हे मासे फिश क्युअरिंग यार्डात नेण्‍यात येतात. पारंपरिक पद्धतीने जमिनीवर काम करण्याऐवजी स्वच्छ टेबलांवर ते करण्‍यात येते म्हणजे घाण व वाळू लागण्याचा प्रश्नच येत नाही.

  • या सर्व स्वच्छतेच्या प्रक्रियांसाठी वापरण्याच्या पाण्यात १० पीपीएम क्लोरिन(Chlorine) मिसळतात.
  • प्रक्रिया टेबलांवर माशांच्या पोटातील घाण काढून ते स्वच्छ म्हणजे ड्रेस केले जातात.
  • ड्रेस केलेले हे मासे चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून हे पाणी पूर्णपणे काढून टाकले जाते. यासाठी प्लॅस्टिकच्या सच्छिद्र कंटेनर्सचा(Containers) वापर करतात.
  • पाणी पूर्णपणे काढल्यानंतर मासे (Fish)सॉल्टिंग टेबलवर घेण्‍यात येतात. येथे चांगल्या दर्जाचे मीठ स्वच्छ हातांनी एकसमान रीतीने माशांना लावले जाते. मासे व मिठाचे प्रमाण ४:१ असते
  • सॉल्टिंगनंतर(Salting) हे मासे सिमेंटच्या स्वच्छ टाक्यांत कमीत कमी २४ तासांपर्यंत व्यवस्थित रचून ठेवतात. यानंतर माशाला बाहेरून चिकटलेले जादा मीठ काढण्यासाठी ते गोड्या पाण्याने थोडा वेळीच धुतले जातात.
  • हे खारावलेले मासे स्वच्छ फलाटांवर सुकवले जातात. हे फलाट म्हणजे सिमेंटचे ओटे किंवा बांबूचे सांगाडे असू शकतात. हे शक्य नसल्यास बांबूच्या चटईवर ठेवूनदेखील सुकवले तरी चालतात, परंतु अशा वेळी माशांमधील आर्द्रता २५ टक्के किंवा त्याहून कमी असणे गरजेचे आहे.
  • ही पद्धत अत्‍यंत सोपी असून, कोणीही सहजपणे करू शकतो. क्युअर केलेले मासे दीर्घकाळ टिकविता येतात. ही पद्धत तुलनात्‍मक स्‍वरूपात स्वस्त पडते. त्यामुळे माशांचा साठवणुकीचा काळ (शेल्फ लाइफ) वाढत असल्याने तसेच कालांतराने मिळणाऱ्‍या दरामध्येही फायदा होत असल्याने उत्पादनाचा थोडासा वाढीव खर्च होत असला तरी तो लगेच भरून निघतो.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Tree Law: सागवान तोडीसाठी परवानगीची गरज संपली; महाराष्ट्र सरकारची नवी अधिसूचना

    Bhimashankar Temple Darshan: भीमाशंकरला विनापास थेट दर्शन

    Foodgrain Production Decline: अन्नधान्य उत्पादनात घट शक्य; एल निनो’मुळे खरीप विस्कळीत

    Water Shortage Issue: पुरंदर तालुक्यातील १९ गावांना २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

    US-Iran Nuclear Talks: अमेरिका-इराण वाटाघाटींना धक्का

    SCROLL FOR NEXT