Farm Commodities Agrowon
कृषी पूरक

शेतकऱ्यांनी ७७ बाजार समित्यांतून घेतले ५२ कोटींचे शेतमाल तारण कर्ज

कोरोना (Corona) संकटात शेतमाल बाजारपेठ (Market) विस्कळित झाल्यामुळे शेतमालाचे दर पडले होते.

ॲग्रोवन वृत्तसेवा

पुणे : कोरोना (Corona) संकटात शेतमाल बाजारपेठ (Market) विस्कळित झाल्यामुळे शेतमालाचे दर पडले होते. कोरोना आणि शेतमालाचे कोसळलेले दर अशा दुहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेने काही प्रमाणात तारले. ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२ या खरीप हंगामात (Kharif Season) ७७ बाजार समित्यांमधून ४ हजार ४४३ शेतकऱ्यांनी सुमारे ५२ कोटींचे शेतमाल तारण कर्ज (Loan) घेतल्याची माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

राज्य कृषी पणन मंडळाद्वारे १९९० पासून शेतमाल तारण कर्ज योजना विविध बाजार समित्यांमधून राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे शेतमालाच्या किमतीच्या ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत सहा टक्के व्याजाने कर्ज स्वरूपात दिली जाते. याचा लाभ अन्नधान्य उत्पादक शेतकरी (Farmer Producer) घेत आहेत.
या योजनेअंतर्गत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, हरभरा, भात, करडई, ज्वारी, बाजरी, मका, घेवडा, काजू बी, बेदाणा, सुपारी, हळद (Tur, green gram, udi, soybean, sunflower, gram, rice, safflower, sorghum, bazaar, maize, ghewda, cashew nuts, raisins, betel nut, turmeric) आदींचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत व्याजावरील ३ टक्के व्याज सवलत पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांना दिली जाते. तसेच एखाद्या बाजार समितीकडे स्वनिधी नसेल तर अशा बाजार समित्यांना पणन मंडळाद्वारे ५ लाखांचा अग्रिम दिला जातो. असेही पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Fake Seeds: अहिल्यानगरमध्ये बोगस कपाशी बियाण्यांचा गैरप्रकार; शेतकऱ्यांचे नुकसान, शासनाचे कडक कारवाईचे आश्वासन

Kharif Sowing : मराठवाड्यात ४५ लाख ७० हजार हेक्टरवर पेरणी

Mangrove Conservation : कांदळवन संवर्धनातून साकारतेय हरित अर्थव्यवस्था

Improved Crop Variety : महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे विकसित पिकांचे सुधारित वाण

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ नव्हे, हा तर स्वार्थपीठ महामार्ग : राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT