Diseases Of Poultry
Diseases Of Poultry  
कृषी पूरक

कुक्कुटपालनात रोगनियंत्रण महत्वाचे

रोशनी गोळे

माणसांप्रमाणे जनावरांमध्ये तसेच पशु-पक्ष्यांनाही विविध रोगाची बाधा होत असते. रोगाची बाधा होण्यासाठी तीन घटक गरजेचे असतात. जसं कि स्वतः होस्ट म्हणजे जनावरे, पशु-पक्षी, दुसरं म्हणजे रोगाची लागण करणारा रोगजंतू आणि या दोन्ही गोष्टी असल्यानंतर रोगाची बाधा होण्यासाठी अनुकूल वातावरणाची गरज असते. कारण रोगजंतूंनी कोणाच्याही शरीरात प्रवेश केल्यानंतर अनुकूल परिस्थिती नसल्यास रोग होऊ शकत नाही किंवा रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो.

कुक्कुटपालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कोंबड्याचे रोग नियंत्रण फार महत्वाचे आहे. संक्रमक रोग ज्याची बाधा एका कोंबडीपासून दुसऱ्या कोंबडीला होत असते. असे रोग झाल्यानंतर नियंत्रणात आणणे अवघड जाते. त्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण फायद्याचे ठरते. यासाठी उपचारापेक्षा सतर्कता महत्वाची.

कोंबड्यांमध्ये साधारणपणे खालील रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

रानीखेत- कोंबड्यामध्ये सर्व वयोगटामध्ये आढळून येणारा हा रोग आहे. हा श्वसनाचा रोग असून Paramyxo viridae नावाच्या जीवाणुमुळे होत असतो. प्रमुख लक्षण म्हणजे कोंबड्याना हिरवी-पिवळी हगवण लागते. यात कोंबड्यांच्या दोन्ही पायांना आणि पंखाना पक्षाघात होतो. या रोगामध्ये म्रुत्युदर हा ८० ते ९० टक्के इतका असतो. यावर उपाय म्हणून पिल्ले ५ ते १० दिवसांची असताना लासोटा किंवा RDVF ची लस द्यावी. प्रादुर्भावग्रस्त भागात दर दोन महिन्यांनी कोंबड्याचे लसीकरण करून घ्यावे.

फाऊल पॉक्स - या आजारात प्रामुख्याने पंख कमी असलेल्या शरीराच्या भागात कोंबड्याना जखमा झालेल्या दिसून येतात. लहान पिल्ले या रोगाला लवकर बळी पडतात. यात कोंबड्यांच्या त्वचेवर, तोंडात, डोळ्यात-नाकात फोड तयार होतात. हा संसर्गजन्य अतिसंक्रमित रोग आहे.

गंबोरो  म्हणजेच IBD(Infectious Bursal Disease)- हा कोंबड्यांच्या पचनसंस्थेचा रोग आहे. विषाणूजन्य रोग आहे. रोगाने बाधित कोंबड्या खाण-पिण कमी करतात. पेंगायला लागतात, अडखळत चालतात, पातळ पांढरी हगवण होते. गुदद्वाराजवळची पिसे, विष्ठेमुळे घाण होतात. प्रादुर्भाव झाल्यानंतर पहिले २-३ दिवस म्रुत्युचे प्रमाण अधिक असते.

रक्ती हगवण (कॉक्सीडिओसिस)   हा रोग 'कॉक्सीडिया’ या रक्तातील परजीवींपासून होतो. कोंबड्यांच्या विष्टेमध्ये रक्त दिसते. लालसर पातळ विष्ठा कोंबड्या टाकतात. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कोंबड्यांचा तुरा कोमेजतो, कोंबड्या पेंगतात, खाणे कमी होते. अंडी-उत्पादनही कमी होते. अशक्तपणा आढळतो. तसेच कोंबड्यांची मरही मोठ्या प्रमाणात आढळते.

उपचारापेक्षा प्रतिबंध बरा’ या युक्तीने रोग होऊ नये म्हणून वेळेत लसीकरण केले पाहिजे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती टिकून राहण्यास मदत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT