जनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे शरिराला आवश्यक असणाऱ्या घटकांची कमतरता निर्माण होऊन दुग्धोत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते. जनावरे गाभण राहत नाहीत व वारंवार उलटतात. त्यामुळे वाढे किंवा निकृष्ट चाऱ्यावर चुन्याची प्रक्रिया करावी. ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक मानले जाते. त्यामुळे उसाच्या वाढ्याचा जनावरांच्या चाऱ्यात मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. दुष्काळात चारा छावण्यात वाढ्याचा व उसाचा स्वस्त आणि एकमेव उपलब्ध चारा म्हणून वापर होत असतो. वाढ्याचा मोठ्या प्रमाणावर व सातत्याने चारा म्हणून वापर केल्याने जनावरांच्या प्रकृतीवर व दुग्धोत्पादनावर अनिष्ट परिणाम दिसू लागले आहेत. त्याचे कारण म्हणजे वाढ्यामध्ये आॅक्झालेट नावाचा घटक मोठ्या प्रमाणावर असतो. हा घटक जनावरांकडून पचवला जात नाही, तसेच शरीरातून बाहेर पडताना कॅल्शियम बरोबर कॅल्शियम आॅक्झालेट नावाचे संयुग बनवून कॅल्शियमलाही बाहेर घेऊन जातो. अशाप्रकारे शरीरातील कॅल्शियम कमी झाल्याने आतड्यामधून फॉस्फरस नावाचा घटकही कमी प्रमाणात शोषला जातो. परिणामी शरीराला आवश्यक असणाऱ्या दोन्हीही क्षार घटकांची कमतरता होते. त्यामुळे दुग्धोत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते. जनावरे गाभण राहत नाहीत व वारंवार उलटतात. आॅक्झालेट चाऱ्यातून कमी करण्यासाठी चाऱ्यावर चुन्याच्या निवळीची प्रक्रिया करणे उपयुक्त ठरते. १) चुन्याच्या निवळीची प्रक्रिया साहित्य ः कळीचा चुना, मीठ, झारी, पाणी साठविण्याचा पिंप, उसाचे वाढे इ. प्रक्रिया
प्रक्रिया केल्याने होणारे रासायनिक बदल
प्रक्रियेचे फायदे
२) वाढ्याचा मुरघास ऑक्झालेट हा घटक अधिक असणे, प्रथिने कमी असणे तसेच पाचकता कमी असणे यामुळे वाढे चारा म्हणून योग्य नाही. यावर उपाय म्हणून वाढ्याचा मुरघास बनविताना खालील गोष्टी केल्यास त्याचे पौष्टिक चाऱ्यात रुपांतर होऊ शकते.
संपर्क ः डॉ. सचिन रहाणे, ७०३८५३५१८१ डॉ. शरद लोंढे, ९६०४३७६२११ (पशुधन विकास अधिकारी, आणि सदस्य ‘चारा साक्षरता अभियान’ समन्वय समिती, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.