गोठ्याजवळ झाडे लाऊन जनावरांसाठी निवाऱ्याची सोय करावी.
गोठ्याजवळ झाडे लाऊन जनावरांसाठी निवाऱ्याची सोय करावी. 
कृषी पूरक

जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा

धरमिंदर भल्ला, डाॅ. एस. पी. गायकवाड

कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे असणाऱ्या साधनसामग्रीचा विचार करावा. गोठ्यामध्ये योग्य निवारा, कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अणि चारा खाण्यासाठी गव्हाण असावी. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहून दूध उत्पादनात वाढ मिळते.   कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा तयार करताना कमी खर्चात अधिक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये त्या किती वेळ टिकतील याचा थोडा कमी विचार केलेला असतो, कारण कमी भांडवलात बऱ्याच गोष्टींचे नियोजन करावयाचे असते. त्यामुळे ज्या गोष्टीमध्ये आपण खर्च करू शकत नाही अशा गोष्टीसाठी तडजोड करता येत नाही. गोठ्याचे नियोजन करत असताना गाईसाठी खर्चात काटकसर करता येणार नाही. कारण चांगल्या गुणवत्तेच्या गाईसाठी जास्त किंमत द्यावीच लागेल. काही पशूपालक गोठ्याच्या बांधकामासाठी जास्तीत जास्त खर्च करतात, त्यामुळे व्यवसायातील महत्त्वाच्या घटकांसाठी पैशाची अडचण निर्माण होते. या महत्त्वाच्या घटकांमध्ये तडजोड केल्यामुळे चांगले दूध उत्पादन मिळत नाही, त्यामुळे व्यवसाय आतबट्ट्याचा होतो. दहा गाईंसाठी मुक्त संचार गोठा

  • निवाऱ्यासाठी झाडाची मदत घेणार असल्याने निवाऱ्यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही.
  • दहा जनावरांसाठी ५० फूट लांब व १० फूट रुंद असे शेड करण्यासाठी सर्वसाधारणपणे या भागाचा भौगोलिकदृष्ट्या विचार करून त्यांची उंची ठरवावी लागेल.
  • स्वच्छ सूर्यप्रकाश गोठ्यात सर्वदूर पसरण्यासाठी गोठ्याची दिशा ही जास्तीत जास्त दक्षिणोत्तर अशी ठेवावी.
  • आपल्या भागातील वाऱ्याचा व तापमानाचा विचार करून गोठ्याची उंची ठरवावी. जास्त तापमान असणाऱ्या भागात हवेचा निचरा चांगल्या प्रकारे होऊन हवा खेळती राहून तापमान कमीत कमी राहावे यासाठी अशा शेडची उंची सर्वसाधारण शेडच्या उंचीपेक्षा काही प्रमाणात जास्त ठेवावी.
  • याउलट डोंगराळ भाग व ज्या ठिकाणी वाऱ्याचे प्रमाण जास्त असते अशा ठिकाणी गोठ्याच्या शेडची उंची कमी ठेवली तरी चालते.
  • आपल्या भागाचे पर्जन्यमान, तापमान व वारा यांचा सखोल अभ्यास करून गोठ्याचा आराखडा तयार करावा.
  • सर्वसाधारण पर्जन्यमान व सर्वसाधारणपेक्षा जास्त तापमान असलेल्या भागात कमी खर्चात १० गाईंचा गोठा कसा करावयाचा याचा विचार करू.
  • सर्वसाधारणपणे पाठीमागील म्हणजे शेपटाकडील उंची ६ फूट व तोंडाकडील उंच भागाची उंची ८ फूट घ्यावी. यासाठी ८ फुटावर एक लाकडी डांब उभा करावा लागेल. याप्रमाणे मागील बाजूचे ६ डांब हे ७.५ ते ८ फुटाच्या लांबीचे लागतील तर पुढील डांब ९.५ ते १० फूट लांबीचे लागतील असे १२ डांब लागतील. त्यानंतर उभ्यासह डांब टाकून त्यावर आडवे टाकण्यासाठी तीन ओळीसाठी ५० फूट लांब अशी १५० फूट लांबीची लाकडे लागतील.
  • सहा उभे सहा डांब ही लाकडे मुख्य डांबापेक्षा जरा कमी क्षमतेची असली तरी चालतील. अशा आराखड्यावर गवताचे आच्छादन करू शकतो किंवा पत्राही वापरू शकतो. अशा प्रकारचे शेड हे नैसर्गिक म्हणजे इको-फ्रेंडली असतात. या शेडमध्ये सहा महिन्याने किंवा वर्षाने थोड्याफार देखभाली लोखंडी आराखड्यापेक्षा जात वेळ द्यावा लागतो. असे शेड जास्त तापमान असणाऱ्या भागात जर असले तर जनावरांना जास्त मानवते. यामध्ये सूर्याची उष्णता ही खाली गोठ्यात कमी प्रमाणात येते.
  • गवत हे उष्णता रोधक म्हणून काम करते. परंतु वारंवार जास्त देखभाल करावी लागत असल्याने एकदाच चांगले करू या भावनेने ते पत्र्याचा पक्का गोठा तयार करतात, परंतु नंतर जनावरांच्या आजाराची देखभाल जास्त करावी लागते. सर्वसाधारणपणे २ ते ४ वर्षांनी या गवताचे आच्छादन बदलून पुन्हा नवे टाकावे लागते. हे शेड जरी फायदेशीर असले तरी बहुतांश शेतकऱ्यांना ही छप्पर बदलण्याची कटकट नको असते.
  • दहा जनावरांच्या लाकडी शेडचा अंदाजे खर्च

    तपशील नग दर रक्कम (रु.)
    ८ फुटी डांब २०० १२००
    १० फुटी डांब २४० १४४०
    १२ फुटी उभे डांब ३०० १८००
    ५० फूट आडवे डांब २०० ६००
    लहान लाकूड गरजेप्रमाणे - - ५००
    गवत गरजेप्रमाणे - - १०००
    मजुरी - - २०००
    एकूण - - ८५४०

    संपर्क ः डॉ. एस. पी. गायकवाड, ०२१६६ - २२१३०२ (लेखक गोविंद मिल्क ॲण्ड मिल्क प्राॅडक्टस् प्रा. लि. फलटण, जि. सातारा येथे  कार्यरत आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT