आजारी जनावरे वेगळे करून त्यांच्यार योग्य ते औषधोपचार करून काळजी घ्यावी.
आजारी जनावरे वेगळे करून त्यांच्यार योग्य ते औषधोपचार करून काळजी घ्यावी. 
कृषी पूरक

ओळखा लिस्टेरिओसिस आजाराची लक्षणे

डॉ. लीना धोटे, पंकज शेंडे

जनावरापासून माणसास होणारे आजार प्रामुख्याने जिवाणूजन्य, विषाणूजन्य, आदिजीवजन्य आणि बुरशीजन्य या प्रकारात विभागले जातात. असे आजार प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या पशुपालकाला होण्याची शक्यता असते, त्यालाच झुनोटिक आजार असे म्हणतात. लिस्टेरिओसिस म्हणजे काय? लिस्टेरिओसिस हा एक झुनोटिक किंवा प्राणिजन्य मानवीय आजार आहे. म्हणजेच असा आजार जो जनावरांपासून माणसाला किंवा माणसापासून जनावरांना होऊ शकतो. पशुपालक, पशुवैद्यक किंवा कत्तलखान्यात, जंगलात, प्राणिसंग्रहालयात, प्राण्यांच्या दुकानात, दवाखान्यात, प्रयोगशाळेत काम करणाऱ्यांना लिस्टेरिओसिस होण्याचे प्रमाण जास्त आहे. लिस्टेरिओसिस प्रामुख्याने लिस्टेरिया मोनोसायटोजनेस (एल एम) नावाच्या जिवाणूमुळे होतो. एल एम हा एक ग्राम पॉसिटीव्ह रॉड असून मनुष्यामध्ये जवळ जवळ सर्व संक्रमणासाठी नोंदवला आहे. तर प्राण्यांमध्ये लिस्टेरिया मोनोसायटोजनेस, लिस्टेरिया इवानोवी आणि लिस्टेरिया सिलिगेरी नोंदवले गेले आहेत. आजार कोणाला होऊ शकतो? गर्भवती महिलांना, नवजात बालकांना, ६५ किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोकांना आणि कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. प्रादुर्भाव झालेल्या जनावरांमध्ये एंसिफलिटीसी, सेप्टीसेमिया आणि गर्भपात होऊ शकतो. अंदाजे दरवर्षाला १६०० लोक या आजाराला बळी पडतात आणि त्यापैकी २६० जणांचा मृत्यू होतो रोगाचा प्रसार

  • निरोगी जनावरांचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांशी संबंध
  • गोठ्यातील अस्वच्छता
  • जनावरांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष
  • प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या द्रव्य पदार्थच्या म्हणजेच लाळ, रक्त, विष्टा, मूत्र, इ. च्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा हा रोग होऊ शकतो.
  • जिवाणू ने दूषित झालेले अन्न, पाणी, दूध, मांस किंवा त्याचे पदार्थ सेवन केल्याने सुद्धा हा आजार होऊ शकतो.
  • साठवलेल्या खाद्य (सायलेज फीड) सेवन केल्यामुळे जनावरांमध्ये रोग होऊ शकतो.
  • लक्षणे

  • सडकून ताप येणे (१०४ ते १०६ फॅरेनहाईट)
  • अशक्तपणा
  • डोकेदुखी
  • असंतुलितपणा
  • स्नायू वेदना
  • गाभण जनावरे गाभडतात
  • मेंदूवर आघात होऊन झटके येतात
  • गर्भवती महिला-गर्भवती महिलांना सामान्यतः ताप येणे, स्नायू वेदना, फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अश्या महिलांमध्ये गर्भपात (२० टक्के), अकाली प्रसूती, नवजात बालकांचा मृत्यू (३ टक्के) या प्रकारची लक्षणे दिसून येतात.
  • रोगनिदान

  • शरीरातील द्रव्य पदार्थापासून लाळ, रक्त, विष्टा, मूत्र इ. पासून किंवा दूषित झालेले अन्न, दूध, मांस व त्यांचे पदार्थ, पाणी, सायलेज फीड पासून प्रयोगशाळेत जिवाणू लिस्टेरिया मोनोसायटोजनेसचे निदान केले जाऊ शकते.
  • सिरॉलॉजिकल चाचणी - अँटीबॉडीज तपासणी
  • एलिसा
  • डॉट ब्लॉट
  • एन्टीबीओटीक संवेदनशील चाचणी
  • प्रतिबंध आणि नियंत्रण

  • आजारी जनावरे वेगळे करून त्यांच्यार योग्य ते औषधोपचार करून काळजी घ्यावी. आजार बरा झाल्याची खात्री झाल्यानंतरच गोठ्यातील जनावरांमध्ये मिसळावे.
  • कच्चे दूध पिल्यामुळे लिस्टेरिया होत असल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे, त्यामुळे दूध उकळून प्यावे.
  • लिस्टेरिओसिस झालेल्या जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाचे सेवन करू नये.
  • जनावरांची प्रयोगशाळेमध्ये लिस्टेरिया चाचणी करून आजार नसल्याची खात्री करून घ्यावी.
  • जनावरे आणि गोठ्याची नियमित स्वच्छता करावी.
  • गोठ्यात जनावरे बदलताना किंवा नवीन जनावरांची खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी.
  • संक्रमन झालेली प्लासेन्टा (नाळ) गर्भाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.
  • कत्तल खाण्यात काम करणारे कामगार, मांस-वेष्टित काम करणारे कर्मचारी व पशुवैद्यक तसेच सतत जनावरांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.
  • संपर्क ः डॉ. लीना धोटे, ७९७२४१३५३३ (पशुवैद्यक महाविद्यालय, बिदर, कर्नाटक.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

    Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

    Yedgaon Dam Victim : येडगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी धरणात पाणीसाठा राखून ठेवावा

    Interview with PM Narendra Modi : आर्थिक विकासाची महाराष्ट्रासाठी ‘गॅरंटी’

    Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

    SCROLL FOR NEXT