खनिज कमतरतेचा परिणाम जनावरांच्या दुग्धोत्पादन व प्रजोत्पादनावर होतो.
खनिज कमतरतेचा परिणाम जनावरांच्या दुग्धोत्पादन व प्रजोत्पादनावर होतो. 
कृषी पूरक

खनिज पुरवठ्यामुळे वाढते प्रजननक्षमता

डॉ. गजानन जाधव, डॉ. सुनीत वानखेडे

सूक्ष्म खनिजांच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये विविध प्रकारचे अाजार उद्भवतात. यामध्ये प्रजननाशी संबंधित अाजारांचे जास्त प्रमाण अाहे. यामध्ये गर्भपात, लवकर माजावर न येणे, मुका माज दाखविणे, शारीरिक वाढ मंदावने, गर्भधारणेचा दर कमी होणे इ. अाजारांचा सामवेश होतो. हे अाजार अोळखून वेळीच उपचार होणे गरजेचे असते.   सर्व प्रकारच्या गाभण, दुधाळ, गायी, म्हशी, पैदाशीचा वळू, रेडे, मांसल शेळ्या, मेंढ्या जनावरांच्या निरोगी वाढीसाठी आणि उत्तम उत्पादनासाठी विविध पोषण मूल्यांची आवश्‍यकता असते. त्यामध्ये खनिज हा शरीराला आवश्‍यक असणाऱ्या मूलभूत पोषण मूल्यांपैकी अविभाज्य असा एक घटक आहे. त्यासाठी जनावरांच्या अाहार खनिजांचा योग्य प्रमाणात पुरवठा करणे अावश्‍यक अाहे.

सूक्ष्म खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे आजार विविध सूक्ष्म खनिजांमुळे वेगवेगळे आजार उद्‌भवतात. यामध्ये विशेषतः

  • गर्भधारणेच्या सुरवातीच्या काळातील गर्भपात.
  • गाय/ म्हैस व्यायल्यानंतर जार पूर्णपणे गर्भाशयातून योग्य वेळेत बाहेर न पडणे अथवा अडकून राहणे.
  • गायी/ म्हशी लवकर माजावर न येणे किंवा मुका माज ओळखण्यास कठीण जातो. आणि बऱ्याचदा तो न ओळखता निघून जातो. परिणामी नुकसानाला सामोरे जावे लागते.
  • प्रजननक्षम वळूंच्या कामोत्तेजनेमध्ये कमतरता निर्माण होते. वीर्यनिर्मितीचे प्रमाण कमी होऊन त्याची गुणवत्ताही खालावते. परिणामी वळूंमध्ये वंध्यत्वाची गंभीर समस्या निर्माण होते.
  • जनावरांची लैंगिक आणि शारीरिक वाढ मंदावून जनावरे उशिरा वयात येतात.
  • गर्भधारणेचा दर (कळण्याचे प्रमाण) कमी होते. गायी/ म्हशी लगेचच उलटतात, त्यामुळे जनावरे फळविण्यासाठी नव्याने माजावर येण्याची वाट पाहावी लागते. परिणामी त्याचा वेळ, खाद्याचा खर्च वाया जातो आणि आर्थिक नुकसान होते.
  • गायी/ म्हशींमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होते.
  • गर्भाशयाची अपूर्ण वाढ होते. तसेच गर्भधारणेसाठी अनुकूल वातावरणनिर्मितीत बाधा येते.
  • गर्भपाताचे प्रमाण वाढते.
  • प्रदीर्घ काळ प्रसूती वेदनांना सामोरे जावे लागते.
  • कमी वजनाची/ अशक्त वासरे जन्माला येतात.
  • शेळ्या/ मेंढ्या/ डुकरे यांमध्ये एकावेळी अनेक पिले जन्माला येण्याची संख्या कमी होते.
  • गायी/ म्हशी व्यायल्यानंतर गर्भ पूर्वावस्थेत येण्यासाठी दीर्घकाळ लागतो. आणि व्यायल्यानंतर प्रथम माजावर येण्याचा काळही वाढतो.
  • जन्मजात विकलांग वासरे जन्माला येण्याचे प्रमाण वाढते. मेलेली वासरे जन्माला येण्याची संख्या वाढते.
  • कासदाह, गर्भाशयाची सूज व इतर आजाराला जनावरे सहज बळी पडतात.
  • उत्पादन मोठ्या प्रमाणावर खालावते (दुग्ध व मांसल).
  • डॉ. गजानन जाधव, ७५८८६८९७४७ (स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

    Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    SCROLL FOR NEXT