दुधउत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जनावरांना पोषक संतुलित आहार पुरवावा 
कृषी पूरक

चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार जनावरांचे पोषण

डॉ. सचिन राऊत

वयस्क व दुधाळ जनावरांना केवळ चारा व कडबा खाण्यास दिल्याने दूध उत्पादन प्राप्त होणार नाही. ज्या पशुपालकांकडे पाण्याची सोय आहे, त्यांनी योग्य प्रकारे नियोजन केले तर वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे चा­ऱ्यावर खर्च कमी होईल. चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार वयस्क व दुधाळ जनावरांना पोषण द्यावे.  

  • साधारणपणे ४०० किलो वजनाच्या जनावराला कडब्यासोबत १.५ किलो खुराक द्यावा. दुधाळ गार्इंसाठी २.५ किलो दूध उत्पादनासाठी १ किलो खुराक वेगळा द्यावा.
  • वाळवलेल्या चा­ऱ्यामध्ये पोषक तत्वांची मात्रा जास्त असते. असा चारा असेल तर ४०० किलो वजन व १० किलो दूध उत्पादन असलेल्या गाईला ४ किलो खुराक द्यावा.
  • द्विदल चारा उपलब्ध असेल तर खुराकाची आवश्यकता कमी असते. कडब्यासोबत दैनंदीन कार्यासाठी प्रतिदिन ८-१० किलो द्विदल चारा आवश्यक असतो. या गार्इंना ५ किलो दूध उत्पादनासाठी जवळपास ३० किलो बरसीम किंवा लसूणघास व सोबत कडबा द्यावा.
  • खुराकामध्ये स्वस्त खाद्य घटक जसे मका, ज्वारी, डाळींचा भरडा, पेंड यांचा वापर करता येतो.
  • गाभण गार्इंचा आहार

  • गाभण गार्इंना स्वत:च्या निर्वाह, उत्पादनासोबत गर्भाच्या विकासासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते.
  • गर्भावस्थेच्या पहिल्या सहा महिन्यांत गर्भाचा विकास सामान्य गतीने होतो, या काळात निर्वाह व उत्पादनासाठी देण्यात येणा­ऱ्या आहाराने गरज भागविली जाते.
  • सहा महिन्यांनंतर गर्भाच्या वाढीचा वेग जास्त असतो. या काळात नेहमीच्या आहाराव्यतिरिक्त १० ते १५ किलो हिरवा चारा व १ ते १.५ किलो खुराक द्यावा. या सोबतच ३०-४० ग्रॅम खनिज क्षार मिश्रण व ३० ग्रॅम मीठ आवश्य द्यावे.
  • विण्याच्या १५ दिवस आधी पासून २ ते २.५ किलो खुराक द्यावा. विल्यानंतर ऊर्जा मिळण्यासाठी गार्इंना गुळाचे पाणी पाजवावे.
  • दुधाळ जनावरांचे पोषण

  • दुधाळ जनावरांचे पोषण त्यांचे दुधउत्पादन, दुधातील स्निग्धांशांचे प्रमाण (फॅटचे) यावर अवलंबून असते.
  • दूध उत्पादन क्षमता वाढी सोबत पोषक तत्वांची आवश्यकता वाढते. उच्च उत्पादक जनावरांच्या दुग्धकाळाच्या शेवटीदेखील खुराक द्यावा, जेणे करून नंतरच्या दुग्धकाळासाठी शरीरात पोषक तत्वांची कमतरता राहणार नाही.
  • आपल्याकडील पाणी, जमीन यांच्या उपलब्धतेनुसार योग्य नियोजन केले तर उत्पादन जास्त व स्वस्त होईल जे की किफायतशीर ठरेल.
  • संपर्क ः डॉ. सचिन राऊत, ७५८८५७१५११ (मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई) 

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Forest Department Action: कांदळवन कारवाईवर संशय

    Milk Adulteration: ‘एफडीए’च्या कारवाईने दुग्ध व्यवसायात खळबळ

    Women In Agriculture: ससून नवघरच्या डोंगरावर बहरली फळबाग

    Village Road: पंचवीस वर्षांपासूनचा रस्त्याचा वाद मिटला

    Tur Crop Insurance: चौदा मंडलामध्ये तुरीचा २२ कोटी १३ लाख रुपये पीकविमा परतावा देय

    SCROLL FOR NEXT