अमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय म्हणून शेती आणि पूरक उद्योगांकडे लक्ष देण्यास सुरवात केली. गेल्या चार वर्षांत टप्प्याटप्प्याने पीक उत्पादनात होत असलेल्या वाढीमुळे त्यांचा शेतीमधील हुरूप वाढला. केवळ पीक उत्पादनावर अवलंबून न राहता त्यांनी मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि शेळीपालनास सुरवात केली आहे.
अमरावती शहरातील ॲड. झिया खान यांचे वडील अजीजोद्दीन खान हे मध्य प्रदेशात कृषी विभागात नोकरीला होते. खान कुटुंबीयांचे मूळ गाव अचलपूर. आईदेखील शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे झिया खान यांना लहानपणापासून शेतीची आवड होती. शेतीच्या आवडीपोटी झिया खान यांनी २००६ मध्ये अमरावतीपासून २६ किलोमीटर अंतरावरील भातकुली शिवारात सहा एकर पडीक जमीन खरेदी केली. पहिल्यांदा जमिनीचे सपाटीकरण केले. शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी विहीर खोदली. टप्प्याटप्प्याने हंगामी पिकांची लागवड सुरू केली.
शेतीच्या दैनंदिन नियोजनासाठी त्यांनी गावातील मित्राकडे शेती व्यवस्थापनाची जबाबदारी दिली. शेती कामासाठी दोन मजूर ठेवले. शेती कामाच्या गरजेनुसार हंगामी मजूर घेतले जातात. २००९ मध्ये शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी खान यांनी १०० बाय १०० बाय ३ मीटर आकारमानाचे शेततळे खोदले. २०१६ मध्ये खान यांनी शेतापासून सव्वा किलोमीटर अंतरावरील पेढी नदीवरून पाइपलाइन केली. हे पाणी शेततळ्यात सोडले. वर्षभर पाण्याची सोय झाल्याने खान यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार पालेभाज्या, कारले, काकडी, वांगी, मिरची लागवडीवर भर दिला आहे.
असे आहे नियोजन
थेट भाजीपाला विक्रीवर भर अमरावती शहरातील रहिवासी कॉलनी, तसेच कार्यालयीन विभागामध्ये खान यांनी भाजीपाला विक्रीचे नियोजन केले आहे. भाजीपाला वाहतुकीसाठी छोटे मालवाहू वाहन खरेदी केले. दर दिवसाआड शहरात तसेच परिसरातील आठवडी बाजारात भाजीपाला विक्री केली जाते. यामुळे थेट ग्राहक जोडले गेले आहेत. भाजीपाल्याचे उत्पादन जास्त झाले, तर व्यापाऱ्यांना विक्री केली जाते. येत्या काळात ग्राहकांचे व्हॉट्सॲप गट करून थेट भाजीपाला, फळे, कोंबडी आणि माशांच्या विक्रीचे नियोजन केले आहे.
शेळीपालन
शेततळ्यात मत्स्यपालन
गावरान कोंबड्यांचे संगोपन
ॲग्रोवन ठरला दिशादर्शक ॲड. झिया खान हे ॲग्रोवनचे पहिल्यापासूनचे वाचक. विषयानुसार त्यांनी ॲग्रोवनमधील लेख आणि यशोगाथांची फाइल तयार केली. यातील माहितीचा पीक व्यवस्थापन तसेच कुक्कुटपालन, शेळीपालनाच्या नियोजनात उपयोग केला जातो. तीन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या अमरावतीमधील कार्यालयातदेखील ॲग्रोवन सुरू केला. त्यामुळे त्यांच्याकडे वकिली सल्ला घेण्यासाठी येणारे शेतकरीदेखील ॲग्रोवन वाचतात. त्यातील माहिती लिहून घेतात किंवा झेरॉक्स काढून घेऊन जातात. कृषी विभागातर्फे शेतकरी गट तसेच परिसरातील शाळेतील विद्यार्थी अभ्यास सहलीसाठी ॲड. खान यांच्या शेतीला भेट देतात. या वेळी शेतकरी व विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शनदेखील करतात.
- ॲड. झिया खान, ९२७१२६००९६
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.