A balanced, complete diet helps to improve the breeding capacity of animals.
A balanced, complete diet helps to improve the breeding capacity of animals. 
कृषी पूरक

पशुप्रजननातील संभाव्य अडथळे ओळखा

डॉ. पूजा गायके, डॉ. अनिल पाटील

प्रजनन व्यवस्थापनात ऋतुमानानुसार, तांत्रिक सल्ल्यानुसार आणि आधुनिक व्यवस्थापनाची जोड देऊन बदल करून दूध उत्पादन घेणे शक्य आहे. प्रजनन संस्थेचे बदल ऋतुमानानुसार होत असतात, त्या अनुषंगाने पशुपालकांनी पशुप्रजननाचे महत्त्व लक्षात घेऊन व्यवस्थापनात त्वरित बदल करणे गरजेचे आहे. दूध उत्पादनात सातत्य राहण्यासाठी जनावरातील प्रजनन व्यवस्थापन योग्य व सक्षम असणे गरजेचे आहे. दुधाळ गाईंकरिता वर्षाला वासरू होणे गरजेचे आहे व दुधाळ म्हशींकरिता प्रत्येक १३-१४ महिन्यांत वासराचे उत्पन्न झाले पाहिजे. हिवाळा व पावसाळा पशुप्रजननाच्या दृष्टीने पोषक असतो व उन्हाळ्यात पशुप्रजननात अनेक दुष्परिणाम दिसून येतात. जसे कि गर्भपात होणे, क्षीण माज, झार अडकणे, वंध्यत्व, तात्पुरते वंध्यत्व, सतत उलटणे व इतर प्रजननविषयक आजार. फायदेशीर पशुपालनासाठी प्रजनन कार्य कायम सुरू असणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात होणारा प्रजननातील अतिमहत्त्वाचा अडथळा म्हणजे गर्भपात होय. गर्भपात

  • दुधाळ जनावरे गाभण असल्यापासून म्हणजेच ४६ ते २८० दिवसांचा गर्भ गर्भाशयाच्या बाहेर पडणे या अवस्थेला गर्भपात होणे असे म्हणतात. ४२ दिवसांचा गर्भ बाहेर पडण्याचा गर्भपातास भृणमृत्यू असे संबोधले जाते.
  • गर्भपाताची कारणे

  • उन्हाळ्यातील वाढते तापमान  
  • विविध संक्रामक किंवा श्वसन रोग  
  • जास्त वजन किंवा कमी वजन  
  • खनिज घटक (कॅल्शियम, लोह, फॉस्फरस) कमी होणे  
  • प्रथिनांचा अभाव  
  • व्हिटॅमिन एच व ई ची कमतरता  
  • दुखापत  
  • खूप थंड पाणी पिणे  
  • खाद्यातून विषारी पदार्थ खाण्यात अल्यास  
  • संप्रेरकांची कमतरता  
  • अचानक राहणीमानात किंवा इतर व्यवस्थापनात बदल करणे
  • उन्हाळ्यातील अचानक वाढणाऱ्या तापमानामुळे गर्भाचा रक्तदाब कमी होणे, ऑक्सिजनची कमतरता आणि आम्लपित्त या कारणामुळे गर्भपात होतो.

  • उन्हाळ्यात जनावरांचा आहार कमी होतो, प्रजनन यंत्रणेवर परिणाम होतो, उष्णतेचा ताण असणारी जनावरे माजावर येत नाहीत व गाभणसुद्धा राहण्यास अडचणीची ठरतात.  
  • गाभण जनावरास उष्णतेचा ताण बसल्यास गर्भपात होतो व ताण सहन करण्यासाठी व उष्णतेचे निस्सारण करण्यासाठी जनावर धापा टाकते.  
  • जनावराच्या पोटातील हालचाली मंदावतात व संपूर्ण पचनक्रिया बाधित होते.  
  • जनावराच्या शरीरातील क्षारांचे संतुलन बिघडल्यामुळे जनावराला आम्ल-पित्ताचा त्रास होऊन पातळ जुलाब होऊ शकते. दूध उत्पादन नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकांवर परिणाम होतो.  
  • जनावरांच्या खुरांचे आजार, तसेच लंगडेपणाचे प्रमाण वाढते.  
  • जनावराच्या संप्रेरक निर्मितीत बदल होतो, त्यामुळे जनावराचे उत्पादन, आरोग्य, आहार व प्रजनन यावर विपरीत परिणाम होतो.
  • गर्भपाताची लक्षणे

  • गाई व म्हशी या जनावरांमध्ये गर्भपात हा बहुधा सात महिन्यांची गर्भावस्था किंवा त्यानंतर होतो. यात योनीतून पिवळसर, तपकिरी अथवा चॉकलेटी रंगाचा स्राव वाहतो.  
  • झार अथवा वार लवकर पडत नाही.  
  • पोटात दुखणे, अस्वस्थ राहणे, पाट ताणणे, चारा न खाणे.
  • उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी

  • गर्भपात झालेल्या जनावरास झाडाच्या सावलीत अथवा इतर थंड ठिकाणी बांधावे व हलके पाचक गूळमिश्रित खाद्य द्यावे, त्यामुळे जनावरांना ऊर्जा मिळते.  
  • आहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा.  
  • गर्भपातामुळे जनावराच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना खुराक, गव्हाचा कोंडा, ओट तसेच अलशीच्या बिया देणे गरजेचे आहे.  
  • गर्भपात झालेल्या जनावरात जर वार अडकला असेल, तर पशुवैद्यकाला बोलावून योग्य उपचार करावेत.  
  • हिरवा मका, चवळी, कडवळ, लसूणघास यांसारखी पोषक वैरण द्यावी, त्यामुळे दूध उत्पादनातील सातत्य टिकून राहते व प्रजनन क्षमताही सुधारते.  
  • खाद्यातून अ जीवनसत्त्वाचा पुरवठा करण्यासाठी जास्तीत जास्त हिरवा चारा द्यावा.  
  • उन्हाळ्यात जनावरांना लाळ्याखुरकूत व फऱ्या यांसारख्या रोगांची रोगप्रतिबंधक लस योग्य वेळी द्यावी.  
  • गोठ्याच्या आजूबाजूने झाडे लावावीत, जेणेकरून वातावरण थंड राहील.  
  • छतावर तुषार सिंचनाची सोय करावी. गोठ्याच्या छतावर पालापाचोळा किंवा पाचट टाकल्यास उष्णतेचे प्रमाण कमी होते.  
  • गोठ्यात हवा खेळती राहण्यासाठी पंखा लावावा, यामुळे गोठ्याचे तापमान आटोक्यात राहील व वाढत्या तापमानामुळे होणारा जनावरांतील गर्भपात टाळता येईल.
  • संपर्कः  डॉ. अनिल पाटील, ७५८८०६२५५६ (पशुप्रजननशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

    Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

    SCROLL FOR NEXT