गाभण जनावरांची वेळेवेळी आरोग्य तपासणी उपयुक्त ठरते. 
कृषी पूरक

गाभण गाई, म्हशींची काळजी घ्या

डॉ. अनिल पाटील

गायीचा गाभण काळ ९ महिने ९ दिवस आणि म्हशीचा गाभण काळ १० महिने १० दिवसांचा असतो. वासरांची गर्भाशयातील वाढ, पुढच्या वेतात दूध उत्पादन, तंदुरुस्त वासरांचा जन्म आणि व्याल्यानंतर गर्भाशयाचे आरोग्य हे सर्व प्रसूतीपूर्व जनावरांच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते.   जनावरांतील कृत्रिम रेतनाने अथवा नैसर्गिक पैदाशीने गाभण करवून घेतलेली तारीख पशुपालकाने नोंद करून ठेवावी. दोन ते अडीच महिन्यांनी तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून ती तपासून गाभण असल्याची खात्री करून घ्यावी. गाभण असल्यास रेतनाच्या तारखेवरून ती सर्वसाधारणपणे कोणत्या तारखेला विणार हे निश्‍चित करता येते. जनावरे विण्याची तारीख नोंदवणे आवश्यक आहे. गायीचा गाभण काळ ९ महिने ९ दिवस (२८० दिवस) तर म्हशीतील १० महिने १० दिवस (३१० दिवस) असतो. १) गाभण जनावर इतर जनावरांपासून वेगळे करणे 

  • गर्भधारणा झाल्यापासून गर्भाशयात वासराची वाढ पहिले सहा महिने हळूहळू होत असते. या काळात गाई-म्हशी दूधही देत असतात, त्यामुळे त्यांना नियमित अधिकचा समतोल आहाराचा पुरवठा करावा. त्याचा उपयोग गर्भ वाढीलाही होतो.
  • गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यांत गर्भाची वाढ झपाट्याने होत असते. म्हणून शेवटचे तीन महिने गाभण जनावर आणि गर्भ या दोघांच्याही दृष्टीने फार महत्त्वाचे असतात.
  • या काळात जनावरांचे दूध झपाट्याने कमी होते, त्यामुळे याच काळात पशुपालकांकडून गाभण जनावरांकडे दुर्लक्ष होते. जनावरांना शरीरात मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि प्रथिने साठवून ठेवणे गरजेचे असते. यांचा उपयोग त्याच्या दैनंदिन शारीरिक वाढीसाठी, गर्भाच्या पोषणासाठी, कासेतील दूध तयार करणाऱ्या पेशींच्या पुनरुज्जीवनासाठी, चीक तयार करण्यासाठी, दुभत्या काळात शरीरातून वापरलेल्या घटकांची पूर्तता करण्यासाठी, व्यायल्यानंतर प्रथम दुग्ध काळासाठी, रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी आणि इतर शारीरिक क्रियांसाठी होतो.
  • शरीरातील घटकांची पूर्तता न झाल्यास गाभण जनावरे अशक्त होतात. गर्भपात होण्याची शक्‍यता असते. वासरू कमी वजनाचे जन्माला येते, विताना त्रास होतो, वार वेळेवर पडत नाही, दूध कमी पडते आणि याचा परिणाम आपल्या दुग्ध व्यवसायाच्या अर्थशास्त्रावर पडतो.
  • गाभण जनावरांना आहारातून आवश्‍यक प्रथिने, ऊर्जा, क्षार, जीवनसत्त्वे आणि स्वच्छ पाणी देणे आवश्‍यक असते. गाभण जनावरांना नेहमीचा चारा, वैरण आणि शरीर पोषणासाठी आवश्‍यक असलेला दोन किलो पशुखाद्याशिवाय एक ते दोन किलो अधिक पशुखाद्य त्याबरोबर मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी द्यावे.
  • गाभण जनावरांना रोज थोडे चालण्याच्या व्यायामाची अत्यंत जरुरी असते, यामुळे त्यांचे स्नायू, तसेच पचनेंद्रिये उत्तम राहतात. यामुळे प्रसूतीच्या वेळी जनावरांना त्रास होत नाही.
  • शेवटच्या दोन महिन्यांत गाभण जनावरांचे दूध आटविण्याची प्रक्रिया करावी.
  • गाभण जनावरांना शेवटचे तीन आठवडे रानात, तसेच डोंगर भागात चारण्यासाठी पाठवू नये. स्वतंत्र बांधून गोठ्यातच चारा-पाण्याची व्यवस्था करावी.
  • गोठा मोठा, स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर असावा. गोठ्याला जास्त उतार नसावा. उतार जास्त असल्यास गर्भाच्या वजनामुळे मायांग बाहेर येण्याची शक्‍यता असते.
  • गाभण जनावरांना रोज खरारा करावा. गोठ्यात गाभण जनावरांना बसण्यासाठी गवताचा किंवा कुटाराचा गादीप्रमाणे वापर करावा.
  • जनावरावर कोणत्याही प्रकारचा ताण तणाव येऊ नये. जनावरे विताना पशुपालकाने योग्यरीत्या विशेष काळजी घ्यावी.
  • जनावरे विण्याची लक्षणे ः

  • गाभण काळ संपल्यानंतर जनावरांमध्ये विण्याची प्रक्रिया होत असते. यात सर्वसाधारपणे जनावरांत सुलभ प्रक्रिया होत असते, परंतु काही वेळा कष्ट प्रसूती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • कासेचा आकार मोठा होतो, सडामध्ये चीक असतो. त्यामध्ये ताठरपणा जाणवतो. सर्वात पाठीमागचा भाग विस्तारलेला दिसतो. स्नायू ढिले होतात.
  • जनावराचे खाद्य खाणे व पाणी पिणे कमी होते, अस्वस्थता वाढते, शेपटी वर करते. एकांतची जागा शोधते.
  • गाई, म्हशी काही विशिष्ट कालावधीत कळा देतात, स्पष्ट प्रसूती वेदना दिसून येतात. सारखे ऊठ-बैस करते.
  • जन्मल्यानंतर वासराची काळजी घेणे आवश्यक असते. गाई, म्हशींचा वार ४ ते ८ तासात पडणे अपेक्षित असते. जनावर विताना पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. वासरू जन्मण्याचा कालावधी किमान २ ते ३ तासाचा असतो.
  • प्रसूतीनंतर जनावरांची घ्यावयाची काळजी 

  • जन्मलेल्या वासराचे त्वरित नाक व तोंड स्वच्छ करावे. जन्मल्यानंतर गाई, म्हशी वासरांना चाटत असतील तर ती प्रक्रिया पूर्ण होऊ द्यावी.
  • जनावरांना प्रसूतीनंतर लागेच पोष्टिक खुराक व मूबलक प्रमाणात स्वच्छ पाणी द्यावे.
  • वार दूर खोल खड्ड्यात पुरून द्यावे. गाई, म्हशीस स्वच्छ धुवावे.
  • वासराला दूध पाजावे. वासराची नाळ २ ते ३ इंच अंतराने कापावी. त्यावर जंतुनाशक लावावे.
  • काही कालावधीनंतर दूध काढावे.
  • दररोज निर्जंतुक पाण्याने संपूर्ण जनावरांचे शरीर व कासेचा भाग धुवावा.
  • संभाव्य प्रजननातील अडथळे ः

  • गर्भपात
  • गर्भाशयास पीळ पडणे
  • विचित्र वासरांचा जन्म
  • वार अडकणे, गर्भाशयातील रक्तस्राव
  • गर्भाशय बाहेर पडणे, गर्भाशयाचा दाह, गर्भाशयात पू भरणे.
  • डॉ. अनिल पाटील ः ७५८८०६२५५६ (पशुप्रजननशात्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

    Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

    khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

    Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

    Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

    SCROLL FOR NEXT