शेळ्यांना पुरेसा आहार द्यावा.
शेळ्यांना पुरेसा आहार द्यावा. 
कृषी पूरक

शेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचे

डॉ. श्रद्धा सिरसाट (इंगळे)

शेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी शेळीचे पोषण, आरोग्य आणि पुनरुत्पादनाकडे लक्ष द्यावे. जातिवंत शेळ्या आणि बोकडाची निवड करावी. सामान्यत: त्या क्षेत्रातील शेळीच्या स्थानिक प्रजातीला प्राधान्य द्यावे. 

शेळी पालनाची सुरवात करताना शेळीच्या प्रजातींची निवड करणे फार महत्त्वाचे आहे. प्रजातींची निवड शेळी पालनाचा उद्देश, भौगोलिक स्थिती, पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता यावर अवलंबून असते. सामान्यत: त्या क्षेत्रातील शेळीच्या स्थानिक प्रजातीला प्राधान्य द्यावे. शेळीपालन करण्यासाठी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बाहेरील चांगली नर प्रजाती स्थानिक शेळीसह गर्भधारणा करण्यासाठी वापरली जाऊ शकते. त्यामधून नवीन सुधारित प्रजाती मिळवता येते. असे दिसून आले आहे की ज्या शेळ्या जास्त संख्येने करडे देतात, त्यांच्या करडांचे कमी वजन असते. त्याउलट ज्या शेळ्या कमी संख्येत करडे देतात, त्यांचे वजन जास्त असते. जातिवंत शेळ्या आणि बोकडाची निवड करावी.

बोकड निवड 

  • बोकडाचे पालक शुद्ध जातीचे असावेत. शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असावेत.
  • कोणत्याही अनुवांशिक विकारांपासून मुक्त असावा. त्याच्या पिढ्यांमध्ये कमी मृत्युदर असावा.
  • मांस प्रमाणापेक्षा दुधाचे प्रमाण जास्त असावे. नरांचे पुनरुत्पादक अवयव चांगले विकसित असावेत. उच्च प्रजनन क्षमता असावी. 
  • जन्माच्या वेळी, तीन महिने, सहा महिने आणि नऊ महिन्यांच्या दरम्यान जास्त वजन असावे. बोकड आकर्षक असावा.
  • शेळ्यांसाठी गोठा

  • गोठ्यांची लांबी पूर्व-पश्‍चिम दिशेने असावी. कुंपण भिंतीची उंची १ ते २ मीटर व दोन्ही बाजूंनी ताराने बांधलेले असावे. 
  • गोठ्यांची जमीन मातीची असावी, त्यावर कालांतराने चुना शिंपडावा. गोठ्यांची माती एका वर्षांत दोनदा बदलावी. 
  •  ८० ते १०० शेळ्यांसाठी २० × ६ चौरस मीटर गोठ्याचे क्षेत्र आणि १२ × २० चौरस मीटरची मोकळी जागा असावी. 
  •     जन्माच्या एक महिन्यानंतर शेळी आणि करडाला वेगळे ठेवावे. फक्त दूध पिण्याच्या वेळी एकत्र ठेवावे. 
  • आरोग्य व्यवस्थापन

  •  आजारी शेळ्या, करडांवर वेळेवर उपचार करावेत.
  •  गोठ्याची स्वच्छता ठेवावी.
  •  शिफारशीनुसार जंत निर्मूलन, लसीकरण करावे.
  •   करड्यांचे व्यवस्थापन 

  • जन्म झाल्यानंतर सर्वप्रथम नवजात करडाची नाळ साफ करून दोन इंचांचे अंतर सोडून नवीन ब्लेडने कापावी. त्यावर टिंचर आयोडीन लावावे.
  • जन्मानंतर नवजात करडाला त्याच्या आईबरोबर वेगळ्या गोठ्यात ठेवावे. गोठ्यात करड्यांच्या झोपण्याच्या जागेवर वाळलेले मऊ गवत पसरावे. 
  • नवजात करडाला पहिल्या ३० मिनिटांच्या आत आईचे पहिले दूध (चीक) पाजावा. करड्यांना दोन वेळेला दूध पाजणे फायदेशीर आहे.
  • आहार व्यवस्थापन

  • शेळीच्या वजनाप्रमाणे ३ ते ५ टक्के घन आहार द्यावा. एका प्रौढ शेळीला १ ते ३ किलो हिरवा चारा, ५०० ग्रॅम ते १ किलो भुसा आणि दररोज १५० ते ४०० ग्रॅम डाळ व ज्वारी द्यावा. 
  •  कडधान्य कधीही पूर्ण स्वरूपात देवू नये. नेहमीच दळण व कोरड्या स्वरूपात द्यावे, त्यात पाणी घालू नये. आहारामधे ६० ते ६५ टक्के दळलेले धान्य, १० ते १५ टक्के ढेप, २ टक्के खनिज मिश्रण आणि १ टक्का सामान्य मीठ याचे मिश्रण असावे. 
  •  गाभण शेळीला वजनाच्या एक महीना अगोदर ५० ते १०० टक्यांपर्यंत जास्त धान्य द्यावे. जेणेकरून सशक्त करडांचा जन्म होईल.
  •     बोकडाला सुद्धा प्रजनन काळामधे दररोज १०० टक्के जास्त दळलेले धान्य द्यावे.
  •     स्वच्छ पाणी पाजावे.
  •  -डॉ. श्रद्धा सिरसाट (इंगळे), ९०११६६८०२१ (सहायक प्राध्यापक, अपोलो पशुवैद्यकीय महाविद्यालय, जयपूर, राजस्थान)  - डॉ. प्रकाश केकान, ९४२२३३६१४२ (पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT