शेळ्यांसाठी हवेशीर गोठा असावा.
गोठ्याचा आकार, शेळ्यांच्या संख्येनुसार ठरवावा. ऊन, वारा, पाऊस यांच्या तीव्रतेनुसार दिशा ठरवावी. खूप मोठा गोठा बांधू नये. गोठा बांधताना पाण्याचा निचरा होणाऱ्या, मुरमाड व पडीक जमिनीचा वापर करावा.
शेळीपालन व्यवसाय करताना गोठा हा चांगल्या पद्धतीचा, कमीत कमी खर्चात बनविलेला व आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर केलेला असावा.गोठ्याचा आकार व जागेची निवड गोठा ज्या ठिकाणी बांधायचा ठरविला आहे, त्या ठिकाणच्या वातावरणाचा विचार करणे आवश्यक आहे. उन्हाची तीव्रता, थंडीचे प्रमाण, पावसाचे प्रमाण आणि वाऱ्याची तीव्रता व दिशा या गोष्टींना जास्त महत्त्व द्यावे. गोठ्याचा आकार, शेळ्यांच्या संख्येनुसार ठरवावा. ऊन, वारा, पाऊस यांच्या तीव्रतेनुसार दिशा ठरवावी. खूप मोठा गोठा बांधू नये. गोठा बांधताना पाण्याचा निचरा होणाऱ्या, मुरमाड व पडीक जमिनीचा वापर करावा. वारा, पाऊस ज्या दिशेने येतो, गोठ्याची ती बाजू बंद केलेली असावी. शेळ्यांच्या संरक्षणासाठी गोठ्याभोवती मजबूत कुंपण करावे. गोठ्यावर एकूण किती खर्च होणार आहे, याचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. खर्च कमीत कमी आणि गोठ्यातील उत्पन्नावर आधारित असावा. बंदिस्त गोठ्याच्या आजूबाजूला बंदिस्त भागाच्या दुप्पट जागा शेळ्यांना फिरण्यासाठी आणि दिवसभर व्यायामासाठी मोकळी असावी. ओला आणि वाळलेला चारा साठवणूक आणि कुट्टी यंत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र शेडची व्यवस्था करावी. शेळ्यांच्या संख्येनुसार चाऱ्याची लागवड करावी. साधरणतः २० शेळ्यांच्या चाऱ्यासाठी १ एकर जमिनीवर चारा लागवड करावी. शेळ्या, खाद्य व इतर गोष्टींच्या वाहतुकीसाठी सोय असावी. शेळ्यांना स्वच्छ व २४ तास मुबलक पाण्याची सोय असावी. - डॉ. कल्याणी सरप, ९०९६८७०५५० (कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)