अजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश अनंत कासले यांनी फळबागेला शेळीपालनाची जोड दिली. दृष्टिदोष असून देखील जगदीश कासले यांनी अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर शेळीपालन व्यवसायात चांगला जम बसविला. याचबरोबरीने सेंद्रिय पद्धतीने आंबा, काजू बागेचे व्यवस्थापन करून उत्पन्नात वाढ मिळविली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-मालवण रस्त्यावरील अजगणी हे छोटेसे गाव. या गावशिवारात प्रामुख्याने भात, आंबा, काजू, कोकम, बांबू यांसारख्या विविध पिकांची प्रामुख्याने लागवड आहे. याचबरोबरीने पाण्याच्या उपलब्धतेनुसार भुईमूग, कुळीथ, पालेभाज्यांची लागवड येथील शेतकरी करतात. अशा या अजगणी गावातील जगदीश अनंत कासले हे आंबा, काजू आणि भात शेतीचे व्यवस्थापन पाहतात. जगदीश यांना लहानपणापासून ६० टक्के दृष्टिदोष आहे. परंतु, आत्मविश्वास आणि कुटुंबाच्या प्रोत्साहनाने त्यांनी प्रयत्नपूर्वक पदवी तसेच आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या शेती प्रगतीमध्ये दृष्टिदोष कधीच अडथळा ठरला नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जगदीश यांनी कुटुंबासोबत शेती विकासामध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली. उपलब्ध क्षेत्र आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कासले कुटुंबीयांनी काजू, आंबा, बांबू लागवडीवर भर दिला आहे. केवळ शेती उत्पन्नावर अवलंबून न राहता जगदीश कासले यांनी पाच वर्षांपूर्वी शेळीपालनाची जोड दिली. शेळीपालन व्यवसाय करण्याचे निश्चित झाल्यावर जगदीश कासले यांनी किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये दोन दिवस तसेच सांगली येथे अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी महामंडळामध्ये दोन दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी जिल्ह्यातील किमान पाच वेगवेगळ्या प्रकल्पांना भेट देऊन शेळी व्यवस्थापनातील समस्या आणि अनुभव जाणून घेतले. त्यानतंरच २०१५ मध्ये शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. शेळ्यांचे व्यवस्थापन
आंबा, काजू बागेला लेंडीखताचा वापर
अर्धबंदिस्त शेळीपालन फायदेशीर
जागेवर शेळी, बोकडांची विक्री
कोंबडीपालनाची जोड परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कासले यांनी कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने परसबागेत गिरिराजा, वनराजा या सुधारित कोबड्यांच्या जातींचे संगोपन केले आहे. दिवसभर कोंबड्या परस बागेत मोकळ्या सोडलेल्या असतात. त्यामुळे लसीकरणाशिवाय या कोंबड्यांच्या व्यवस्थापनाचा फारसा खर्च नाही. प्रति किलोस अडीचशे रुपये असा दर त्यांना जागेवर मिळतो. सध्या त्यांच्याकडे ५० कोंबड्या आहेत.
कुटुंबाची मोलाची साथ जगदीश कासले यांना फळबाग तसेच शेळीपालनामध्ये कुटुंबाची चांगली साथ मिळाली आहे. त्यांचे वडील अनंत कासले निवृत्त शिक्षक आहेत. त्यांची फळबाग व्यवस्थापनात चांगली मदत होते. जगदीश यांच्या पत्नी शलाका या शेळ्यांचे दैनंदिन व्यवस्थापन, शेडची स्वच्छता, शेळ्यांना हिरवा चारा नियोजन अशा कामांची जबाबदारी सांभाळतात.
- जगदीश कासले, ९४२३०७९०६२
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.