azola production
azola production  
कृषी पूरक

जनावरांच्या खुराकात मिसळा ॲझोला

योगेश पाटील

जनावरांच्या आहारात संकरित नेपिअर, सुबाभूळ, चवळी, लसूणघास यांचा वापर करावा. त्याचबरोबरीने ॲझोलाचाही चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. जैविक खत म्हणून वापरात असणाऱ्या ॲझोलामध्ये प्रथिने, खनिजे (जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब) अमिनो आम्ल यासारखी घटक द्रव्ये इतर चाऱ्यांचा पिकांपेक्षा जास्त असल्याने याचा वापर जनावरांच्या आहारात केला असता दूध उत्पादनाबरोबरच दुधातील स्निग्ध घटक वाढतो. खाद्याच्या खर्चात  बचत होते.

ॲझोला तयार करण्याची पद्धत 

  • ॲझोला वाढीसाठी सूर्यप्रकाशाची जरुरी असते. यामध्ये नत्राचे स्थिरीकरण करण्याची क्षमता असल्यामुळे त्याच्या वाढीसाठी नत्राची आवश्यकता लागत नाही. मात्र थोड्या प्रमाणात स्फुरद आवश्यक असते. पूरक वातावरणात ॲझोलाची वाढ साधारणतः आठ दिवसात दुप्पट होते. 
  • ॲझोला तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी जागा सपाट आणि तणरहीत करून घ्यावी.
  • १० सें.मी. उंचीच्या विटा वापरून २.२५ X १.५ मीटर आकाराचा आयताकृती वाफा तयार करावा. वाफ्याच्या तळाशी प्लॅस्टिक पेपर पसरावा.यानंतर २.५ मीटर X १.८ मीटर आकाराचा १५० जी. एस.एम. जाडीचा  प्लॅस्टिक कागद वाफ्याचे काठ झाकले जातील या पद्धतीने अंथरावा. अशारितीने १० सें.मी. खोलीचा वाफा तयार होईल.
  •  या वाफ्यामध्ये ३० ते ३५ किलो चाळलेली माती सारख्या प्रमाणात पसरावी. १० किलो चांगले कुजलेले शेणखत,१०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट २० लिटर पाण्यात मिसळावे. तयार झालेले द्रावण वाफ्यामध्ये सावकाश ओतावे.
  • वाफ्यामध्ये ७ ते १० सें.मी. उंची राहील एवढे पाणी सावकाश ओतावे.
  • त्यानंतर १ ते १.५ किलो ॲझोला सारख्या प्रमाणात वाफ्यामध्ये सावकाश सोडावे. 
  • दहा दिवसानंतर १ ते १.५ किलो ॲझोलापासून ८ ते १० किलो ॲझोलाची वाढ झालेली दिसून येईल.
  • अशा वाफ्यातून दररोज १ ते १.५ किलो ॲझोलाचे उत्पादन मिळते.
  •     खाद्यामधील वापर 

  • जनावरांच्या खाद्यामध्ये ॲझोलाचा वापर खुराकाच्या १:१ प्रमाणात करावा. सुरुवातीला थोडेसे ॲझोला खाद्यात मिसळून हळू हळू प्रमाण वाढवत न्यावे. 
  • जनावरांना २ किलो खुराक देत असाल तर १ किलो खुराक आणि १ किलो ॲझोला एकत्र मिसळून द्यावे. जर जास्त प्रमाणात उत्पादन असेल तर त्याचा वाळवून सुद्धा खाद्यात उपयोग करता येतो.
  •       फायदे

  • उत्पादन खर्च जास्तीत जास्त प्रति किलो १ रुपया पर्यंत येतो.
  • दुग्धोत्पादन १५  टक्यांपर्यंत वाढते.
  • खुराकाचे प्रमाण २० टक्यांपर्यंत कमी होऊ शकते.
  •  खाद्यावरील खर्च कमी होतो.
  • दुधातील प्रथिनांचे तसेच स्निग्धांशाचे प्रमाण वाढते.
  • जनावरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • कोंबड्यांना खाद्य म्हणून दिल्यास अंडी देण्याच्या प्रमाणात वाढ तसेच अंड्याच्या पृष्ठभाग चकचकीत होतो.
  • वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खनिजयुक्त असल्याने पिकांसाठी, झाडांसाठी वापरात येते.
  • - योगेश पाटील,९६६५५९९८९९

    (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग,डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, दापोली,जि.रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

    Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

    Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

    Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

    Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

    SCROLL FOR NEXT