lumpi skin disease in animal
lumpi skin disease in animal 
कृषी पूरक

जनावरांमध्ये दिसताहेत `लम्पी स्कीन डिसीज’ची लक्षणे

डॉ. अनिल भिकाने, डॉ रविंद्र जाधव

गडचिरोली, बीड जिल्ह्यात लम्पी स्कीन डिसीज या चर्मरोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.  या साथीच्या रोगाचे पक्के निदान भोपाळ येथील राष्ट्रीय रोगनिदान प्रयोगशाळेत झाले आहे. त्यामुळे आपल्याकडील जनावरांच्यामध्ये याची लक्षणे तपासून पशूपालकांनी पशूतज्ज्ञांच्याकडून उपचार करून घ्यावेत.  

लम्पी स्कीन डिसीज  हा जनावरातील विषाणूजन्य चर्म रोग आहे. याचे जंतू देवी विषाणू गटातील कॅप्रीपॉक्स प्रवर्गात मोडतात.  या विषाणूचे शेळी,मेंढ्यातील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येते. मात्र हा रोग शेळी, मेढयांत अजिबात होत नाही. रोगाचा प्रादुर्भाव गोवंशात (३०टक्के) म्हशीच्या (१.६ टक्के) तुलनेत अधिक प्रमाणात आहे. सर्वसामान्यपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरात तीव्रता अधिक असते. रोग सर्व वयोगटात होत असला तरी लहान वासरे ही प्रौढ जनावरांच्या तुलनेने अधिक प्रमाणात बळी पडतात. उष्ण दमट वातावरणामध्ये जेव्हा कीटकांची वाढ जास्त प्रमाणात होते, तेव्हा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. हिवाळ्यातील थंड वातावरणात प्रसार कमी होतो. रोगामुळे मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी  बाधीत जनावरे अशक्त होत जातात. त्यांचे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते, काही वेळा गर्भपात होतो. प्रजनन क्षमता घटते. रोगामुळे त्वचा खराब झाल्याने जनावर विकृत दिसते. त्यामुळे हा रोग मनुष्यास होईल याची भिती अनेक पशुपालकात निर्माण झाली आहे .परंतू शंभर वर्षाच्या इतिहासात हा रोग मनुष्यात प्रसारीत झाल्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. प्रसार 

  • मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या (स्टोमोक्सीस), डास (अडीस), गोचीड, चिलटे (कुलीकॉईडीस) यांच्या मार्फत होतो.
  • विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो.
  • विषाणू संक्रमण झाल्यानंतर १ ते २ आठवड्यापर्यंत रक्तामध्ये रहातो. त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमण होते. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळयातील पाणी व तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दुषित होते. त्यातून इतर जनावरांना याचा प्रसार होऊ शकतो. 
  • त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ (३५ दिवस) जिवंत राहू शकतात.
  • विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा प्रसार कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो.
  • गाभण जनावरात प्रादुर्भाव झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो.
  • दूध पिणाऱ्या वासरांना आजारी गायीच्या दुधातून व सडावरील व्रणातून रोग प्रसार होतो. 
  • लक्षणे 

  • बाधीत जनावरांमध्ये रोगाचा सुप्त काळ साधारणपणे २ ते ५ आठवडे एवढा असतो.
  • प्रथम जनावराचे डोळे, नाकातून पाणी येते. लसिका ग्रंथीना सूज येते.एक आठवडाभर भरपूर ताप येतो, दुग्ध उत्पादन कमी होते.
  • त्वचेवर हळूहळू १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास इत्यादी भागात येतात.
  • काही वेळा तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, डोळ्याची दृष्टी बाधीत होते. पायांवरील व्रणामुळे सांधे व पायामध्ये सूज येवून जनावरे लंगडतात.
  • प्रादुर्भावामुळे जनावरात फुफ्फुसदाह किंवा कासदाहाची बाधा होऊ शकते.रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते.
  • निदान  रोगनिदानासाठी त्वचेवरील व्रणाच्या खपल्या, रक्त व रक्तजल नमुने यांचा वापर करून विषाणू निदान केले जाते. उपचार 

  • रोग विषाणूजन्य असल्याने त्यावर प्रभावी उपचार उपलब्ध नाही. तरीही इतर रोगांबरोबरीने गुंतागुंत होऊ नयेत म्हणून आवश्यक उपचार तातडीने  केल्यास जनावर पुर्णपणे बरे होते. प्रतिजैविके, ज्वरनाशक, अँटीहिस्टेमिनिक औषधे, प्रतिकारशक्ती वर्धक जीवनसत्व अ व ई, शक्तीवर्धक ब जीवनसत्व तसेच त्वचेवरील व्रणासाठी अँटिसेप्टिक / फ्लाय रिपेलंट स्प्रे यांचा वापर केला जातो.
  • तोंडात व्रण झाल्यास २ टक्के पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्यातील द्रावणाने धुवावे. त्यानंतर तोंडामध्ये बोरोग्लीसरीन लावावे.
  • नियंत्रण 

  • भारतात सध्याच्या काळात या रोगाच्या नियंत्रणासाठी लस उपलब्ध नाही. त्यामुळे नियंत्रणासाठी विविध उपाययोजनेचा अवलंब करावा.
  • बाधीत जनावरांना वेगळे करावे. बाधीत आणि निरोगी जनावरे एकत्रित चरावयास सोडू नयेत. बाधीत भागातून जनावरांची ने-आण बंद करावी. साथीच्या काळात गाव तसेच परिसरातून गोठ्यास भेटी देणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी.
  • बाधीत जनावरांची तपासणी करणाऱ्या पशुवैद्यकांनी योग्य पोशाख परिधान करावा. हात अल्कोहोलमिश्रित सॅनीटायझरने धुवून घ्यावेत. जनावरांची तपासणी झाल्यानंतर कपडे, फूटवेयर गरम पाण्यात धुवून निर्जंतुक करावेत.
  • रोगाने बाधीत जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य जसे की, वाहन, परिसर इत्यादी निर्जंतुक करावे. रोग नियंत्रणासाठी माशा, डास, चिलटे व गोचीड इत्यादींचे निर्मुलन करावे. यासाठी गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • रोगाने बाधीत जनावरांच्या संपर्कातील जनावरांना आयव्हरमेक्टीनचे इंजेक्शन दिल्यास गोचीड नियंत्रण होवून रोगप्रसारास काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसून आले आहे.
  •  - डॉ अनिल भिकाने, ९४२०२१४४५३ (चिकित्सालयीन औषधशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT