नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यापासून सहा किलोमीटरवरील तरसाळी येथील शशिकांत व अनिरुद्ध या पाटील बंधूंनी व्यावसायिक पिकांच्या शेतीला देशी गोसंगोपनाची मोठी जोड दिली आहे. आज शंभरहून अधिक गीर गायींचे संगोपन ते करतात. त्याद्वारे देशी दूध, तूप, व गोमूत्र अर्क यांची निर्मिती करून त्यास बाजारपेठही तयार करण्यात त्यांना यश आले आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा हा डाळिंब व द्राक्षासाठी प्रसिद्ध तालुका आहे. तालुक्यातील तरसाळी येथील सुधाकर धर्मा पाटील यांची सुमारे सत्तर एकर संयुक्त जमीन आहे. शशिकांत आणि अनिरुद्ध हे पाटील बंधू आज या शेतीची जबाबदारी सांभाळतात. शशिकांत यांचे शिक्षण बीएस्सी अॅग्रीपर्यंत झाले असून, अनिरुद्ध एमई (सिव्हिल) झाले आहेत.
व्यावसायिक, प्रयोगशील वृत्ती शशिकांत यांनी शिक्षणानंतर गुजरातमधील साखर कारखान्यात काही वर्षे काम केले. कृषी पदवीधारक असल्याने शेतीत काहीतरी उल्लेखनीय करण्याचा त्यांचा इरादा होता. आपल्या गावानजीकच्या विरगाव येथे दहा वर्षे त्यांनी कृषी सेवा केंद्र चालविले. त्यानंतर २००४ मध्ये चार एकरांत तुती लागवडीचा रेशीम उद्योग सुरू केला. त्या वेळी मोठ्या प्रमाणात असा उद्योग सुरू करणारे ते जिल्ह्यातील पहिलेच रेशीम उत्पादक असावेत. पुढे विक्री व्यवस्था अवघड बनली आणि रेशीम उद्योगाला घरघर लागली. मग तो बंद करावा लागला.
शेती व दुग्धव्यवसायावर लक्ष गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाटील बंधू सेेंद्रिय पद्धतीने शेती करू लागले आहेत. त्यातून त्यांनी शेतीचा खर्च कमी केला आहे. अनिरुद्ध २००८ मध्ये पुणे येथील कंपनीत नोकरीत होते. सन २०१० मध्ये पुण्यातच बांधकाम व्यवसायात ते उतरले. आता मात्र दोघाही बंधूंनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत.
गीर गायींचे पालन
प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती
व्यावसायिक पीकपद्धती
जनावरांची संख्या
संपर्क : शशिकांत पाटील, ९४२२७५५१२८ , अनिरुद्ध पाटील, ९९२१२४२९९५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.