देशी पोल्ट्री उद्योग : ब्रिडिंग, हॅचिंग आणि व्यावसायिक त्रिस्तरीय रचना
देशी पोल्ट्री उद्योग : ब्रिडिंग, हॅचिंग आणि व्यावसायिक त्रिस्तरीय रचना 
कृषी पूरक

देशी पोल्ट्री उद्योग : ब्रिडिंग, हॅचिंग आणि व्यावसायिक त्रिस्तरीय रचना

सुर्यकांत नेटके

अंतरवाली (ता. नेवासा, जि. नगर) येथील कानडे यांचा देशी कोंबडीपालनाचा उद्योग चांगलाच विस्तारला आहे. दक्षिणेकडील व महाराष्ट्रातील देशी कोंबडी यांचा संकर करून त्यांनी चैतन्य गावरान हा देशी कोंबडीचा वाण विकसित केला आहे. ब्रिडिंग, हॅचिंग आणि व्यावसायिक पोल्ट्री अशा त्रिस्तरावरील हा उद्योग वार्षिक पाच कोटींची उलाढाल करतो आहे. नगर जिल्ह्यातील अंतरवाली (ता. नेवासे) येथील कानडे कुटुंबाचा पोल्ट्री उद्योग आज केवळ पंचक्रोशीतच नव्हे, तर जिल्ह्याच्या बाहेर, तसेच परराज्यातही अोळखला जात आहे. विविध टप्पे पार करीत व्यवसायाचे विस्तारीकरण त्यांनी केले आहे.

कानडे यांचा व्यवसाय, वृद्धीचे टप्पे

  • अंकुश कानडे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक होते. नोकरीचा राजीनामा देऊन अंतरवाली येथे
  • १९९७ मध्ये एक हजार ब्रॉयलर कोंबड्याचे पालन त्यांनी सुरू केले. पुढे खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ न जुळल्याने दोन वर्षांत तो बंद करावा लागला.
  • त्यानंतर दोन हजार देशी कोंबड्यांचे ‘चैतन्य ब्रिडर्स' नावाने कुक्कुटपालन सुरू केले. तेथे पारंपरिक पद्धतीने पैदास सुरू केली. देशी कोंबड्या पाळल्या जात असलेल्या राशीन, कर्जत भागातील बाजारातून अंडी खरेदी केली जायची.
  • पिलांना मागणी वाढल्यानंतर २००० मध्ये महिन्याला पंचवीस हजार अंडी उबवणी क्षमता असलेले यंत्र खरेदी केले.
  • त्याच वर्षी नगरमधील ‘एमआयडीसी’ भागात चैतन्य पोल्ट्री फिल्ड ऍण्ड हॅचरिज नावाचा व्यवसाय सुरू केला. त्यालाही मागणीही चांगली होऊ लागली. मात्र, देशी पक्ष्यांची तीन महिन्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत लागणारे खाद्य आणि होणारे वजन पाहता जास्त खर्च होत होता. व्यवसायाचे अर्थकारण काही जुळेना.
  • त्यानंतर दक्षिणेकडील राज्यातील गावरान व महाराष्ट्रातील गावरान यांचा संकर केला. त्या पक्ष्यांना चैतन्य गावरान असे नाव दिले. त्यानंतर पुढे व्यवसायाचा अधिक विस्तार केला.
  • आजचा व्यवसाय दृष्टिक्षेपात - अंडी व मटण- दुहेरी हेतूने

    ब्रिडिंग फार्म

  • अंतरवाली
  • ब्रिडिंग फार्म- ९ शेड्‌स
  • साडेतीन लाख ते चार लाख अंडी उत्पादन प्रति महिना
  • हॅचरी

  • नगर एमआयडीसी
  • हॅचरी- पिलांचे उत्पादन- महिन्याला सात लाख
  • शेतकऱ्यांना देण्यासाठी- तीन लाख- त्याचा दर- प्रति पिलू १६ ते १८ रु.
  • एका कंपनीसोबत करार- त्यांना उत्पा.िदत करून देण्यासाठी- चार लाख
  • व्यावसायिक पोल्र्टी

  • व्यावसायिक पोल्ट्री- ७ शेड्‌स
  • पक्ष्यांची संख्या- ४० हजार
  • किलोला १३५ ते १५० रुपये दराने विक्री, अंडे- सहा ते सात रु.
  • फीडमील

  • महिन्याला- ८० ते ९० टन
  • व्यवसाय- ठळक बाबी

  • व्यवसायातील गुंतवणूक- सुमारे दीड कोटी रु.
  • वार्षिक उलाढाल- पाच कोटी रु.
  • कर्मचारी- सुमारे ९०
  • ग्राहक संख्या- ३०००
  • जिल्ह्यासह तेलंगणा. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश
  • व्यवसायाचे गणित इथे केले फायदेशीर नेहमीचा गावरान पक्षी

  • सुमारे तीन महिन्यांत त्याचे वजन होते- १ किलो
  • त्यासाठी खाद्य लागते- ४ किलो
  • त्या तुलनेत नवे वाण

  • तीन महिन्यांत होणारे वजन- सव्वा किलो
  • त्यासाठी लागणारे खाद्य- ३ किलो
  • ठळक बाबी

  • अंकुश कानडे यांचा मुलगा संतोष आपल्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हे पद सांभाळतो.
  • त्याचबरोबर ब्रिडींग, हॅचींग व मार्केटिंग या मुख्य जबाबदाऱ्याही त्याकडे आहेत.
  • संतोष बी.एस्सी. ॲग्री व एमबीए पदवीधारक आहेत. याशिवाय त्यांनी पोल्ट्री विषयातील तीन महिन्यांचा ‘ॲडव्हान्स’ अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.
  • संकर केलेल्या पक्ष्यांची दक्षिणेकडील जात ही बंगळूर येथील या विषयातील प्रसिद्ध संस्थेकडून आणल्याचे संतोष सांगतात.
  • सध्याची गुंतवणूक दीड कोटींची दिसते. मात्र, टप्प्याटप्प्याने कर्ज घेणे, परतफेड करणे यातून बॅंकेत पत तयार केली आहे.
  • विकसित केलेल्या कोंबडी वाणाच्या पेटंटसाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे.
  • पूर्वी व्यावसायिक स्तरावर पशुखाद्य निर्मिती व्हायची. आता त्यात मोठी स्पर्धा झाल्याने केवळ पोल्ट्री व्यवसायावरच लक्ष केंद्रित केले आहे.
  • मुख्य कोंबड्यांव्यतिरिक्त पाचशे कडकनाथ कोंबड्यांचेही पालन केले जाते.
  • तज्ज्ञांची प्रतिक्रिया पक्ष्यांची जात विकसित करताना किंवा त्याचे व्यावसायिकरण करताना दोन महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. त्यातील एक म्हणजे पक्ष्यांतील रोगप्रतिकारक क्षमता. म्हणजे तो रोगांना किती बळी पडतो, हे पाहावे लागते. दुसरी बाब म्हणजे त्या-त्या हवामान विभागात टिकून वा तगून राहण्याची त्याची क्षमता असावी लागते. कारण हे पक्षी पुढे पोल्ट्री उत्पादकांकडे जाणार असतात. त्यांचे नुकसान या बाबींमुळे होणार नाही, हे पाहावे लागते. विकसित केलेल्या पक्ष्यांच्या जातीच्या त्या विषयातील राष्ट्रीय संस्थेकडून चाचण्या घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. डॉ. एम.बी. धुमाळ ,प्राध्यापक पशुवैद्यक महाविद्यालय, परभणी

    संपर्क : संतोष अंकुश कानडे- ९३७०३१४०६५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

    Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

    Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

    Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

    Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

    SCROLL FOR NEXT