युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी आवश्यक 
कृषी पूरक

युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी आवश्यक

युरियाविषबाधेमुळे जनावरांचा मृत्यू होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. युरिया विषबाधेची सर्वसाधारण कारणे व उपाययोजना यांची माहिती घेऊ.

डॉ. बी. सी. घुमरे, डॉ. विकास कारंडे

युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये होते. उदा. गाय, बैल, शेळी, मेंढी. लहान वासरांच्या रूमेन या पोटाच्या कप्प्याची पूर्णपणे वाढ झालेली नसल्यामुळे युरियाची विषबाधा तुलनेने कमी होते. मात्र विषबाधेमुळे जनावरांचा मृत्यू होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. युरिया विषबाधेची सर्वसाधारण कारणे व उपाययोजना यांची माहिती घेऊ. युरिया विषबाधेची कारणे : युरियाचा वापर पशुखाद्यामध्ये उदा. युरिया मोलॅसिस, मूर घास किंवा युरिया प्रक्रियायुक्त चारा यामध्ये अधिक प्रमाणात झाल्यास ते विषबाधेचे कारण ठरू शकते. युरियाचे प्रमाण एक ते दीड ग्रॅम प्रति किलो जनावरांच्या शरीर वजनानुसार (किंवा ४०० ते ४५० ग्रॅम युरिया) विषबाधक ठरू शकतो.

  • युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्यासोबत सोयाबीन पेंड किंवा सोयाबीनचा भरडा चारल्यास.
  • पेरणीच्या वेळी बांधावर ठेवलेले युरिया खत जनावरांनी खाल्ल्यास.
  • युरिया किंवा इतर खताची रिकामी पोती जनावरांनी चाटल्यास.
  • दुभत्या जनावरांना खुराकामधून अधिक प्रमाणात युरिया खाऊ घातल्यास.
  • जनावरांमध्ये युरियाची विषबाधा होऊन योग्य उपचार न झाल्यास जनावरांचा मृत्यू होतो.
  • विषबाधेची लक्षणे ः

  • जनावरांच्या तोंडाला फेस येणे.
  • पोटफुगी होते. पोटामध्ये वेदना होतात.
  • जनावरांना उभे राहता येत नाही.
  • जनावरे सतत ऊठ बस करतात. थोडीथोडी लघवी करतात. डोळे मोठे करतात.
  • जनावरांना झटके येतात.
  • युरियामुळे पोटात अमोनिया वायू तयार होतो. त्यामुळे ॲसिडासिस तयार होतो. जनावर बेशुद्ध होऊन जनावराचा मृत्यू होतो.
  • युरियाचे प्रमाण जास्त असेल तर जनावराचा अर्ध्या तासामध्ये मृत्यू होऊ शकतो.
  • उपचार: युरियाची विषबाधा झाल्याचे लक्षात येताच,

  • विषबाधा झालेल्या जनावरांना तत्काळ दोन ते आठ लिटरपर्यंत ताक पाजावे.
  • थंड पाणी पाजावे. (मोठ्या जनावरांना ४० लिटर, तर लहान जनावरांना - २० लिटर)
  • पोटातील वायू काढण्यासाठी जनावरांच्या तोंडात घोड्याचा लगाम घालावा. यामुळे जनावराचे तोंड सतत उघडे राहून पोटातील अमोनिया वायू बाहेर पडेल.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत.
  • प्रतिबंधक उपाय :

  • पेरणीच्या काळात शेतामध्ये पेरणी सुरू असताना मोकळ्या जनावरांवर लक्ष ठेवावे. जनावरांनी बांधावर व अन्यत्र ठेवलेल्या खताच्या पोत्यातील युरिया किंवा अन्य खते खाऊ नयेत, यासाठी खताची पोती व्यवस्थित तोंड बांधून ठेवावे.
  • पशुखाद्याद्वारे आवश्यकतेपेक्षा अधिक युरियाचा वापर टाळावा.
  • दुभत्या जनावरांना पशुखाद्याद्वारे युरिया खाऊ घालू नये.
  • खताची पोती व पशुखाद्य वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावीत.
  • युरिया प्रक्रियायुक्त चाऱ्यासोबत सोयाबीन पेंड किंवा सोयाबीनचा भरडा खाऊ घालू नये.
  • वरील प्रकारे काळजी घेतल्यास युरिया विषबाधेमुळे होणारे जनावरांचे मृत्यू टाळता येतील.
  • संपर्क डॉ. बी. सी. घुमरे, ९४२१९८४६८१ डॉ. विकास व्ही. कारंडे, ९४२००८०३२३ (सहाय्यक प्राध्यापक, पशुवैद्यकीय औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mango Farmers Subsidy : आंध्र प्रदेश सरकारने आंबा उत्पादकांना दिले १८४ कोटी रुपयांचे अनुदान; मुख्यमंत्री नायडू यांचा दावा

    Women Empowerment: महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी अधिक गतीने काम करा

    Crop Harvesting Automation: पीक काढणी प्रक्रियेतील स्वयंचलन तंत्रज्ञान

    Natural Farming : २५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे लक्ष्य; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

    Tur Farming: शेतकऱ्यांनी तूर पिकाचे अर्थशास्त्र विचारात घ्यावे

    SCROLL FOR NEXT