पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी वनस्पतीद्वारे बाह्य उपचार करता येतात. यामुळे उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा बराच खर्च वाचू शकतो. शिवाय या वनस्पतींच्या औषधांचा अत्यंत चांगला गुण देखील येतो. जनावरांमध्ये सांधेदुखी हा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. सांध्यामध्ये मार लागणे हे सर्वत्र आढळते, परंतु यात जर जखम झाली किंवा सांध्यास जिवाणूंचा संसर्ग झाला तर तो सुजतो. यामुळे जनावर लंगडते, सांध्यामध्ये वेदना होतात. जीवाणूंच्या संसर्गामुळे जनावरास ताप येतो, आजाराची तीव्रता वाढते, सांध्यामध्ये पू होतो. या आजारावर उपचार करत असताना पशुवैद्यकाद्वारे योग्य ते निदान करून प्रतिजैविकांच्या सोबतच वेदनाशामक, सूज विरोधी औषधांचा वापर करावा. पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी वनस्पतीद्वारे बाह्य उपचार करता येतात. यामुळे उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा बराच खर्च वाचू शकतो. शिवाय या वनस्पतींच्या औषधांचा अत्यंत चांगला गुण देखील येतो. उपयुक्त औषधी वनस्पती निर्गुडी
निलगिरी
कापूर आपल्या रोजच्या वापरात असलेला कापूर हा वनस्पतिजन्य असतो. कापराचा वापर बाधित भागावर लावण्यासाठी करावा. रोहिष तेल
लसूण याचा वापर बाह्य उपचारासाठी करावा. लसूण बारीक करून त्याचा लेप बाधित भागावर लावावा. आले लसणाप्रमाणेच आल्याचा वापर करावा. सूजेवर गोखरू, पुनर्नवा उपयुक्त शरीराच्या एखाद्या भागात पाणी साचून त्या भागावर सूज येणे यालाच शोथ किंवा इडीमा असे म्हणतात. जनावरांमध्ये पोटाच्या भागावर, मानेच्या खाली अशा प्रकारची सूज बऱ्याच वेळी दिसते. शरीरात रक्त वाहत असताना खनिजे, अन्नद्रव्य व जलद्रव्याची रक्तवाहिन्या व पेशी मध्ये देवाण-घेवाण चालू असते. या कार्यात बिघाड झाल्यास रक्तातील जलद्रव्य पेशींमध्ये साठवून राहतात.
आजारावर उपयुक्त औषधी वनस्पती गोखरू
पुनर्नवा
कुश ही वनस्पती मुख्यतः मूत्रल आहे. वनस्पतीचे मूळ औषधीमध्ये वापरतात. - डॉ. सुधीर राजूरकर, ९४२२१७५७९३ (प्राध्यापक, पशू औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.