Thylariasis in sheep and goats
Thylariasis in sheep and goats 
कृषी पूरक

शेळ्या-मेंढ्यांमधील थायलेरिओसिस

डॉ. विठ्ठल धायगुडे, डॉ. जयंत सुकारे

रोगग्रस्त जनावरांना गोचीड रक्त शोषण्यासाठी चावतात तेव्हा थायलेरिया या रक्तआदिजीवीच्या जीवन चक्रातील विकसित झालेले विशिष्ट टप्प्यातील जंतू अशा गोचिडांच्या शरीरात प्रवेश करतात. असे बाधित गोचीड निरोगी शेळ्या-मेंढ्यांना चावल्यामुळे मुख्यत्वेकरून या रोगाचा संसर्ग आणि प्रसार होतो. थायलेरिओसिस (गोचीड ताप) हा आजार संकरित गायी व म्हशींमध्ये आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पशुवैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये झालेल्या सुधारणा व पशुवैद्यकांमध्ये प्रयोगशालेय रोगनिदानाबाबत झालेल्या जागरूकतेमुळे आजारी शेळ्या- मेंढ्यांचे रक्त तपाणीकरिता प्रयोगशाळेत येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. २०१९ मध्ये सर्वांत प्रथम सातारा जिल्ह्यात मेंढ्यांमध्ये याचे निश्‍चित निदान झाले आहे. या आजाराबाबत योग्य निदान न झाल्यास आणि योग्य औषधोपचार न झाल्यास मोठ्या प्रमाणात मरतुक होते. या आजाराच्या उपचारासाठीची औषधेही महाग असल्याने त्याचा प्रतिबंधासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारणे  मेंढ्यामध्ये हा रोग मुख्यत्वेकरून थायलेरिया लेस्टोकार्डी या रक्तआदिजीवीमुळे होतो. थायलेरिया उलेबर्गी आणि थायलेरिया लुवेंशुनीमुळेही हा आजार होऊ शकतो. संसर्ग आणि प्रसार   रोगग्रस्त जनावरांना गोचीड रक्त शोषण्यासाठी चावतात तेव्हा थायलेरिया या रक्तआदिजीवीच्या जीवन चक्रातील विकसित झालेले विशिष्ट टप्प्यातील जंतू अशा गोचिडांच्या शरीरात प्रवेश करतात. असे बाधित गोचीड निरोगी शेळ्या-मेंढ्यांना चावल्यामुळे मुख्यत्वेकरून या रोगाचा संसर्ग आणि प्रसार होतो. लक्षणे  गोचीड चावल्यानंतर साधारण ९ ते १५ दिवसांनंतर आजाराची लक्षणे दिसण्यास सुरूवात होते.

  •  सडकून ताप येतो (१०४-१०६ अंश फॅरनहाइट)
  • लसीका गाठींना सूज येते.
  •  भूक मंदावणे, चारा खाणे बंद होते.
  • नाकातून पाण्यासारखा स्राव वाहतो.
  • काही दिवसांनंतर रक्तक्षय म्हणजेच ॲनेमियाची लक्षणे दिसतात, यामध्ये डोळे, तोंडाची श्‍लेष्मल त्वचा पांढरट पडते.
  • प्रतिजैवकांच्या उपचारास प्रतिसाद देत नाहीत.
  • दिवसेंदिवस मेंढ्यामध्ये दुर्बलता येते.
  • अतिशय तीव्र स्वरूपाच्या आजाराची लक्षणे सुरू झाल्यावर ३ ते ४ दिवसांत जनावर दगाऊ शकते.
  • कमी तीव्र स्वरूपाच्या आजारात जनावर वरील लक्षणांसह बरेच दिवस जीवंत राहू शकते.
  • निदान 

  • लक्षणांवरुन तसेच निश्‍चित निदानाकरिता पशुवैद्यकाकडून तीव्र स्वरूपाच्या आजारात लसीका गाठीची काचपट्टीवर प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी.
  • क्रोनिक (जुनाट) आजारात रक्ताची तपासणीही प्रयोगशालेय निदानाचा महत्त्वाचा भाग आहे.
  • प्रतिबंध आणि उपचार 

  • विविध पद्धतींचा किंवा मार्गाचा अवलंब करून गोचिडांचे समूळ उच्चाटन करणे हा प्रतिबंधात्मक उपायांचा महत्त्वाचा भाग आहे.
  • आजाराची लक्षणे दिसताच पशुवैद्यकांकडून तातडीने उपचार करावे.
  • - डॉ. विठ्ठल धायगुडे, ९०८२२९२३४१ (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

    Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

    Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

    Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

    Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

    SCROLL FOR NEXT