उपकरण अशापद्धतीने मानेला अडकवून गाईच्या खाण्यापिण्याच्या हालचालींवर नजर ठेवता येते.
उपकरण अशापद्धतीने मानेला अडकवून गाईच्या खाण्यापिण्याच्या हालचालींवर नजर ठेवता येते.  
कृषी पूरक

कृत्रिम बुद्धिमत्ता करते गाईंच्या हालचालींचे विश्लेषण

कोजेन्सिस वृत्तसेवा

परदेशातील पशुपालकांकडे पीक लागवड क्षेत्राच्या बरोबरीने गाईंची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पशुपालकांना मोठ्या संंख्येने कुरणावर चरणाऱ्या गाईंच्या विविध क्रियांवर लक्ष ठेवणे खूप अवघड जाते. या अडचणीवर मात करण्यासाठी पशुपालकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर फायदेशीर दिसून आला आहे. पोलंड देशातील एका कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गाईंच्या हालचाली टिपणारे सेन्सर्स यांच्या समन्वयाने चालणारे उपकरण विकसित केले आहे. युरोपीय देश आणि अमेरिकेत या उपकरणाचा वापर पशुपालकांनी सुरू केला आहे. अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील वेनेस्बोरो येथील पशुपालक रिचर्ड वॅटसन यांना या उपकरणांचा चांगला फायदा झाला. विविध समस्यांवर वेळेवर उपाययोजना करता आल्याने दूध संकलनात १० टक्के वाढ झाली. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात चांगली भर पडली. या तंत्रज्ञानाच्या उपयोगाबाबत वॅटसन म्हणाले की, गायीच्या प्रत्येक क्रियेबाबत त्वरित माहिती मिळते. परिणामी तत्काळ उपाययोजना करता येतात. त्यामुळे माझ्या फार्मवरील दोन हजार गायींची निगा राखणे मला खूप सोयीस्कर झाले. तंत्रज्ञानाच्या आवश्‍यकतेवर भर देताना कंपनीचे संस्थापक यासिन खोखार म्हणतात की, सद्यस्थितीत शेतीमध्ये वापरण्यात येत असलेले तंत्रज्ञान हे जुने होत चालले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब झाल्यास दुग्ध व्यवसायातील नफ्याचे प्रमाण वाढणार आहे. उपकरणांची कार्यपद्धती

  • उपकरण गाईच्या मानेभोवती बांधले जाते. गाईच्या विविध हालचालींची नोंद घेऊन सेन्सर्सच्या माध्यमातून संगणकामध्ये नोंदणी होते. संगणकामध्ये माहितीचे विश्‍लेषण होऊन शेतकऱ्याला गाईच्या चालू असलेल्या हालचालीबाबत माहिती मिळत राहाते. या विश्लेषणातून एखादी गाय आजारी असल्याचा किंवा तिची उत्पादनक्षमता घटल्याचा किंवा ती माजावर आल्याचा नेमका अंदाज घेता येतो. परिणामी त्वरित योग्य उपाययोजना करता येते.
  • तंत्रज्ञानाचा वापर करून मिळणारी माहिती मोबाईल फोनवरही पशुपालकाला मिळते. अमेरिकेतील काही पशूपालक मोबाईलवर अशा माहितीचा संदेश देऊ शकतील अशा सेन्सरचा वापर करत आहेत.
  • आयर्लंडमधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका कंपनीने गाईच्या प्रसूतीची नेमकी वेळ सांगू शकणाऱ्या उपकरणाची निर्मिती केली आहे. हे उपकरण गाईच्या शेपटीवर (ती जेथून सुरु होते) बसविले असता गाईच्या पार्श्‍वभागाच्या आकुंचनाच्या तीव्रतेवरून प्रसूतीची नेमकी वेळ मोबाईलवर संदेशाच्या माध्यमातून देते. याशिवाय कंपनीने बनविलेले एक उपकरण गाय माजावर आल्याची नेमकी वेळ सांगते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT