Take care of the health of the newborn calf 
कृषी पूरक

वासरातील आजारावर उपाययोजना

वासरांच्या संगोपनामध्ये अडथळा आणणारा एक घटक म्हणजे लहान वासरांतील आजार. लहान वयात वासरांना आजार झाल्यामुळे त्यांच्या वाढीवर, आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. हे ओळखून तातडीने उपचार करावेत.

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. सौ. मत्स्यगंधा पाटील

वासरांच्या संगोपनामध्ये अडथळा आणणारा एक घटक म्हणजे लहान वासरांतील आजार. लहान वयात वासरांना आजार झाल्यामुळे त्यांच्या वाढीवर, आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. हे ओळखून तातडीने उपचार करावेत. वासरांचे संगोपन उत्तमरीत्या न केल्यास वाढ खुंटते, वासरू वेळेवर वयात येत नाही, उशिरा माजावर येतात, गर्भधारणेस वेळ होतो. शरीरयष्टी मजबूत राहत नाही. याचा पुढे उत्पादकतेवर परिणाम होतो. यासाठी गोठा आणि जनावरांची स्वच्छता ठेवावी. ठरावीक काळानंतर गोठ्यातील सर्व जनावरांची आरोग्य तपासणी करावी. हगवण  कारणे 

  •  एकावेळी जास्त प्रमाणात चीक/दूध पाजणे.
  • ई कोलाय, सालमोनेलोसिस, जंत, कॉक्सिडीयाचा प्रादुर्भाव.
  • गोठ्यातील अस्वच्छता, पाण्यातून संसर्ग.
  • लक्षणे 

  • वासरांची विष्ठा पातळ, पांढरी/रक्तमिश्रित किंवा हिरवट असते.
  • सतत पातळ विष्ठेमुळे शरीरातील पाणी कमी होते. वासरू अशक्त व मलूल बनते.
  • दूध पीत नाही. चारा कमी खाते किंवा चारा खाणे पूर्णपणे बंद होते.
  • पोटात वेदनामुळे पोटावर पाय मारणे, दात खाणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
  • उ पाययोजना 

  • योग्य निदान करूनच उपचार व योग्य उपाययोजना करावी.
  • वासरू एकावेळी किती चीक किंवा दूध पिते याचे निरीक्षण करावे. चीक किंवा दूध जास्त होत असल्यास जास्त चीक/दूध एकाचवेळी पिण्यापासून परावृत्त करावे.
  • दूध पाजण्यासाठीची भांडी स्वच्छ असावीत. गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी.
  • रक्तमिश्रित हगवण असेल, तर वासरांची विष्ठा तपासून कॉक्सिडिया प्रतिबंधासाठी गोठ्यात स्वच्छता राखावी. गोठा कोरडा राहील यांची काळजी घ्यावी.
  • कॉक्सिडीयावर उपचारासाठी पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. पांढरी हगवण सर्वसाधारणपणे जंतुप्रादुर्भावामुळे होते. योग्यनिदान करून उपचार करून घ्यावेत हागवणीमध्ये शरीरातील पाण्याचे, इलोक्ट्रोलाइट्‌सचे संतुलन बिघडते.
  • गुडघे सुजणे  संकरित गाईच्या वासरांत गुडघे सुजण्याची समस्या दिसून येते. कारणे  गोठ्यातील जमिनीवर खाचखळगे, रुतणारे दगड, एकदम कठीण जागा, गुडघ्यास होणारी जखम, इतर जनावरांनी तुडवणे, जंतुसंसर्ग इत्यादीमुळे गुडघे सुजतात. लक्षणे 

  • वासरांच्या एक/दोन किंवा सर्व पायाचे गुडघे सुजलेले दिसून येतात. हात लावल्यास सुरुवातीला कठीण लागते व वासरांस वेदना होतात.
  • वेळेत उपचार न केल्यास पाणी भरल्यासारखी सूज दिसते. कधी कधी गुडघ्याची हाडे दिसू लागतात.
  • वेळेत उपचार न केल्यास गुडघेदुखी लवकर बरी होत नाही. पुढे वासरांना बसल्या जागेवरून उठताही येत नाही.
  • उपाययोजना

  • वासरांना एका ठिकाणी बांधून न ठेवता मऊ जमिनीवर ठेवावे.
  • वासरांच्या गोठ्यातील जमीन मऊ व खाचखळग्या विरहित असावी.
  • मोठ्या जनावरांच्या पायाने वासरू तुडवले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  •  गुडघेसुजीचे योग्य कारण शोधून पशुवैद्यकाकडून वेळीच उपचार करून घ्यावेत.
  • फुप्फुसदाह  कारणे 

  • सकस आहाराचा अभाव, अशक्तपणा, रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
  • अस्वच्छ गोठा व परिसर, पावसात भिजणे, कोंदट गोठा.
  • बाटलीने दूध पाजवताना ठसका लागतो. जंतुसंसर्ग होतो.
  • लक्षणे 

  • वासरू ठसकणे, ढासणे-खोकला येतो.
  • नाकातून स्राव येतो, खाण्या- पिण्यावरील लक्ष कमी होते, अशक्तपणा येतो.
  • मलूल होते, श्‍वसनास त्रास होणे, ताप येतो.
  • उपाययोजना 

  • वासरांना पुरेसा चीक व दूध द्यावे. सकस आहार द्यावा.
  • पोषणतत्त्वांची कमतरता होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • गोठा हवेशीर, स्वच्छ, कोरडा ठेवावा.
  • अतिथंडी व पावसापासून संरक्षण करावे.
  • दूध पाजवताना वासरास हळूहळू ठसका न लागता दूध पाजावे.
  • तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून तत्काळ उपचार करावेत.
  • बेंबीला सूज येणे  कारणे 

  • वासरू जन्मल्यानंतर बऱ्याच वेळा नाळ आपोआप तुटते. तुटलेल्या नाळेला आपण जंतुनाशक लावत नाही. अशा नाळेतून जंतुसंसर्ग होऊन बेंबीला सूज येते.
  • वासरांच्या नाळेला इतर वासरांनी ओढणे, चोखणे, गायी-म्हशीने नाळेच्या ठिकाणी सतत चाटल्यामुळे बेंबीला सूज येते.
  • लक्षणे 

  • सुरुवातीला सूज आलेली जागा लालसर व कठीण दिसते. नंतर या सुजेमध्ये पू होतो.
  • वेळेवर उपचार न केल्यास या ठिकाणी जखम होऊन त्यामध्ये आळ्या तयार होतात. यामुळे जखम वाढते. सतत या ठिकाणाहून रक्त निघते. वासरू या ठिकाणी चाटण्याचा प्रयत्न करते. बैचेन राहते.
  • ताप येतो. दूध पिण्यावरील लक्ष कमी होते. जखम जास्त काळ राहिल्यास टॉक्सेमिया होऊन वासरू दगावते.
  • उपाययोजना 

  • वासरू जन्मल्यानंतर नाळेस शरीरापासून २ इंच अंतरावर निर्जंतुक नायलॉन धागा बांधावा. निर्जंतुक कात्री किंवा ब्लेडने बांधलेल्या जागेपासून १ सेंमी अंतरावर नाळ कापावी.
  • नाळेचा कापलेला भाग टिंक्चर आयोडीन किंवा इतर जंतुनाशकात बुडवावा.
  • गाई-म्हशीला नाळेच्या ठिकाणी सतत चाटू देऊ नये.
  • पशूतज्ज्ञांच्याकडून औषधोपचार करावा.
  • शरीरावरील केस जाणे कारणे  त्वचारोग, क्षारांची कमतरता इ. लक्षणे 

  • तोंड, मान, पाय, पाठीवरील केस निघून जातात.
  • केस गेलेल्या ठिकाणी पुरळ उठतात. काही वासरात फक्त केस जातात.
  • खाजवून जखमा होतात.
  • उपाययोजना 

  • गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवावा.
  • त्वचारोग झालेल्या जनावरांमध्ये वासरांना सोडू नये.
  • वासरांच्या आहारात एकदल व द्विदल चाऱ्याचा दररोज वापर करावा.
  • केस जाऊन त्वचा खाजवत असेल तर त्या ठिकाणी आयुर्वेदिक मलम लावावे.
  • वासरांना नियमीत खरारा करावा, गरजेनुसार धुऊन घ्यावे.
  • संपर्क : डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

    Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

    Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

    Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

    Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

    SCROLL FOR NEXT