Farmer Planning Crop: Silk Farming
Farmer Planning Crop: Silk Farming 
कृषी पूरक

शेतकरी नियोजन पीक : रेशीम शेती

माणिक रासवे

उन्हाळ्यातील तापमानात देखील कोष उत्पादन घेता यावे, यासाठी व्हाइट कोटेड पत्र्याचा उपयोग केला आहे. तसेच संगोपनगृहाच्या चारी बाजूंनी शेडनेटचे कापड लावण्यात आले आहे. मायक्रो स्प्रिंकलरद्वारे संगोपनगृहाच्या छतावर तसेच चारी बाजूंनी पाणी सोडलेले आहे. त्यामुळे संगोपनगृहातील तापमान योग्य राखण्यास मदत होत आहे. शेतकरी :  राधेश्याम खुडे गाव : बोरगव्हाण, ता.पाथरी, जि.परभणी तुती लागवड क्षेत्र :  अडीच एकर कीटक संगोपनगृह :  २  मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेतल्यानंतर काही काळ खाजगी नोकरी केली. परंतु तेथे मन रमले नाही. त्यामुळे गावी येऊन शेती करू लागलो. जमीनधारणा क्षेत्र कमी असल्यामुळे पारंपारिक पीक पद्धतीने उत्पन्नाची शाश्‍वती नव्हती. गावातील रेशीम शेती उत्पादक शेतकऱ्यांपासून प्रेरणा घेऊन रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. 

  • सन २०१३ मध्ये दीड एकर क्षेत्रावर ५ बाय ३ बाय २ फूट अंतरावर व्ही १ वाणाच्या तुतीची लागवड केली. शेतामध्येच २६ बाय ५० फूट आकाराच्या रेशीम कीटक संगोपनगृहाची उभारणी केली. 
  • बायव्होल्टाईन जातीच्या २८० ते ३०० अंडीपुंजांपासून २५० ते २७० किलो कोष उत्पादन मिळते. 
  • मागील ९ वर्षांच्या अनुभवातून दर्जेदार रेशीम कोष उत्पादन घेत आहे. मागील बॅचपासून २४५ किलो कोष उत्पादन मिळाले आहे. 
  • प्रत्येक बॅचपासून महिन्याकाठी खात्रीशीर उत्पन्न मिळू लागले. त्यामुळे आत्मविश्‍वास वाढल्याने तुतीच्या क्षेत्रात अडीच एकरपर्यंत विस्तार केला आहे. तसेच अजून एका रेशीम कीटक संगोपनगृहाची उभारणी केली आहे. 
  • रामनगरम मार्केटमध्ये कोषाला प्रती किलो ४५० इतका दर मिळत असे. मात्र, सध्या स्थानिक बाजारात प्रती किलो ३५० रुपये इतकाच दर मिळत आहे.
  • उन्हाळ्यातील तापमानात देखील कोष उत्पादन घेता यावे, यासाठी व्हाइट कोटेड पत्र्याचा उपयोग केला आहे. तसेच संगोपनगृहाच्या चारी बाजूंनी शेडनेटचे कापड लावण्यात आले आहे. 
  • मायक्रो स्प्रिंकलरद्वारे संगोपनगृहाच्या छतावर तसेच चारी बाजूंनी पाणी सोडलेले आहे. त्यामुळे संगोपनगृहातील तापमान योग्य राखण्यास मदत होत आहे.
  • जमिनीवर सिमेंट क्रॉँक्रिटची गच्ची करण्यात आली आहे. त्यामुळे स्वच्छता राखण्यास मदत होऊन रोगांचा प्रादुर्भाव टाळता आला.
  • पुढील बॅचचे नियोजन 

  • चालू बॅचमधील कोष काढणीस रविवारी (ता.२१) सुरवात केली आहे. 
  • कोष काढणी पूर्ण झाल्यानंतर संगोपनगृहाची साफसफाई केली जाईल. त्यानंतर संगोपनगृह निर्जंतुकीकरण केले जाईल. 
  • तुतीचा उत्तम प्रतीचा पाला दर्जेदार रेशीम कोष उत्पादनासाठी आवश्‍यक आहे. 
  •  चॉकी अवस्थेत रेशीम  कीटकांची विशेष काळजी घ्यावी लागते.  
  • पुढील बॅच घेण्यासाठी तुती बागेचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी कोष काढणी सुरू केल्यानंतर लगेच तुती बागेची छाटणी केली जाते. 
  • छाटणीनंतर बागेतील सऱ्यामध्ये नांगरणी, वखरणी केली जाईल. शिफारसीत खतांच्या मात्रा देऊन पाणी देणार आहे. 
  • आठवडाभरानंतर पुन्हा वखरणी करून तण व्यवस्थापन केले जाईल.
  • छाटणी केल्यानंतर दीड महिन्याच्या कालावधीत पाने तयार होतात. त्यानंतर अंडीपुंज आणून पुढील रेशीम कोष उत्पादन बॅचचे नियोजन केले जाईल.
  • - राधेश्याम खुडे,  ८८८८९३१७९३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT