Calves should be given the recommended dose of deworming.
Calves should be given the recommended dose of deworming. 
कृषी पूरक

वासरांसाठी योग्य प्रमाणात जंतनाशकाची मात्रा

डॉ. बाबासाहेब नरळदकर,  डॉ. गजानन चिगुरे 

जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे  जनावरांच्या शरीराची वाढ घटते. अन्नद्रव्याबरोबर जंत हे खनिजांचे शोषण करतात. या घटकांची पुनरुत्पादन तसेच कालवड माजावर येण्यासाठी अतिशय आवश्‍यकता असते. हे लक्षात घेऊन वेळेवर जंत निर्मूलनाच्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. ढोबळमानाने शेळी-मेंढीच्या सर्व वयोगटांमध्ये जंतनाशकाची मात्रा नियमितपणे दिली जाते; परंतु गाय-म्हैस यांच्यासाठी सर्व वयोगटांमध्ये त्याची आवश्‍यकता भासत नाही. अपवाद वासराचा वयोगट ते कालवड माजावर येईपर्यंत आणि त्यानंतर प्रसूतिपूर्व व पश्‍चात जंतनाशकाची मात्रा दिल्यास गाय-म्हशीचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी व उत्पादनवाढीसाठी फायदा होतो.  जंतप्रादुर्भावामुळे होणारे नुकसान  

  • जंताचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पचनसंस्थेतील आम्ल स्रवण करणाऱ्या ग्रंथीस इजा होते. आम्लाचे संभाव्य प्रमाण घटल्यामुळे प्रथिनांचे पचन होत नाही. शरीराची वाढ व वजन घटते.
  • अनेक प्रजातीचे जंत हे कोलेसीस्टोकायनीन यांच्या प्रमाणात वाढ घडवून आणतात. यामुळे मेंढीमध्ये व इतर जनावरांच्यामध्ये ३० टक्के भूक मंदावते. परिणामी वजनात घट होते.
  • जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे शरीराची वाढ घटतेच; परंतु अन्नद्रव्याबरोबर जंत हे खनिजांचे देखील शोषण करतात. या घटकांची पुनरुत्पादन तसेच कालवड माजावर येण्यासाठी अतिशय आवश्‍यकता असते. जंताच्या प्रादुर्भावामुळे पुनरुत्पादनावर परिणाम होतो. 
  • कालवडीस नियमितपणे जंतनाशक देण्याचे फायदे   

  • अनेक संशोधनांद्वारे हे सिद्ध झाले आहे, की केवळ वय वाढले म्हणजेच कालवड माजावर येत नाही, तर त्यांचे ठरावीक वजन त्या प्रजातीनुसार वाढावे लागते. तरच कालवडी माजावर येतात. याचाच अर्थ परजीवीमुळे वजनातील घट होते. जंतनाशकाची मात्रा दिल्यानंतर योग्य वयामध्ये योग्य वजन वाढून कालवडी माजावर येतात. 
  • एका संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे, की कालवड माजावर येण्याच्या वेळेपर्यंत ठराविकपणे जंतनाशकाची मात्रा दिल्यास त्यांच्या माजावर (प्रथम माजावर) येण्याचा कालावधी ४४ दिवसांनी घटतो. म्हणजेच त्या पहिले वेत ४४ दिवस लवकर देतात. म्हणजेच त्यांच्यापासून ४४ दिवस वाढीव दुग्धोत्पादन लवकर मिळते. 
  • उदाहरणार्थ 

  • एक देशी गाय २.४१ लिटर दूध देत असल्यास एकूण दूध उत्पादन वाढ : ४४ × २.४१ = १०६ लिटर   
  • एक म्हैस ६.१९ लिटर दूध देते असल्यास एकूण दूध उत्पादन वाढ: ४४ × ६.१९ = २७२ लिटर इतका फायदा होऊ शकतो. 
  • जन्मल्यानंतर कालवडीस वयोगटापासून ते थेट माजावर येण्याचे वय (३४ - ३७ महिने) या वेळेपर्यंत पशुतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळ्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार व स्थानिक ठिकाणानुसार वेळापत्रक तयार करावे. त्यांना जंतनाशकाची मात्रा त्या वेळापत्रकानुसार नियमितपणे द्यावी. कालवडीचे माजावर येण्याचे वय व पुनरुत्पादन क्षमता कार्यान्वित ठेवण्यासाठीही प्रयत्न करावा.
  • - डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४  डॉ. गजानन चिगूरे, ९७६१९६४९९९ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT