cattle should be vaccinated by a veterinarian.
cattle should be vaccinated by a veterinarian. 
कृषी पूरक

शिफारशीनुसार जनावरांना लसीकरण आवश्यक...

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. सौ. मत्स्यगंधा पाटील

जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात, औषधोपचार, दोन वेतातील अंतर वाढणे, वासरांची वाढ कमी होणे, इतर आजारांचा प्रादुर्भाव  वाढतो. हे लक्षात घेऊन शिफारशीनुसार लसीकरण आवश्यक आहे. पशूपालनातील आर्थिक उत्पन्नासाठी गोठा व्यवस्थापन, आहार नियोजन , लसीकरण जतंनिर्मुलन इ. बाबी महत्त्वाच्या आहेत.  लसीकरण न करून घेतल्यामुळे लाळ-खुरकूत, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, शेळयातील प्लेग, ब्रुसेलोसिस, गोचिड ताप इ. आजारामुळे जनावरे आजारी पडतात. 

  •   दरवर्षी बऱ्याच ठिकाणी लाळ्या खुरकूत आजाराचा गायी, म्हशींना प्रादुर्भाव  दिसून येतो. या प्रादुर्भावामुळे केवळ प्रत्यक्ष जनावर दगावून नुकसान होत नाही तर अनेक अप्रत्यक्ष घटकांमुळे आर्थिक नुकसान होत असते. मरतुकीमुळे प्रत्यक्षपणे आर्थिक नुकसान होते. 
  •   जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात, औषधोपचार, दोन वेतातील अंतर वाढणे, वासरांची वाढ कमी होणे, इतर आजारांचा प्रादुर्भाव  वाढतो. 
  •   लाळ्या खुरकूत झाल्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन होणारे आर्थिक नुकसान हे ६० ते ६८ टक्के होते.  याच्या प्रादुर्भावामुळे आपल्याकडील उत्पादित मांस व दूध यांना प्रगत देशात अत्यल्प मागणी आहे. यामुळे आपल्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळत नाही आणि अप्रत्यक्षपणे आपले नुकसान होते. 
  •   जनावरांना  लसीकरण न केल्यामुळे होणाऱ्या आजारांचा मानवी आरोग्यावरही काही प्रमाणात अपाय होत असतो. 
  •   सध्याच्या काळात जनावरांना लसीकरण करून घेण्याची वेळ आहे. तरी आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे. परिणामकारक लसीकरण मोहिमेसाठी ‘ मास लसीकरण ’ (Mass Vaccination) ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे. ‘मास लसीकरण’  म्हणजे एका गावातील, वस्तीवरील सर्व जनावरांचे  एकावेळी/ एकादिवशी लसीकरण करणे. यामुळे  प्रसारास आळा बसून आजाराचे उच्चाटन होण्यास निश्चीत मदत होईल.
  • - डॉ. प्रफुल्लकुमार पाटील,  ७५८८०६२५५६  (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT