अगॅलेक्शिया आजारामुळे शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे कमी होते. वजन कमी होते. आजाराची लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना कराव्यात. सांसर्गिक अगॅलेक्शिया हा आजार मुख्यत: मेंढ्यांमध्ये होतो. परंतु शेळ्याही या आजारास बळी पडतात. २०२१ मध्ये महाराष्ट्रातील सातारा, पुणे जिल्ह्यातील काही भागांत आलेली साथीमध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे निश्चित निदान करण्यात आले. इतर भागांतही त्याचा संभाव्य धोका लक्षात घेता पशुवैद्यकांना तसेच पशुपालकांना या विषयी माहिती असणे गरजेचे आहे. या आजारात बाधित शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे कमी होते किंवा पूर्णतः बंद होते, व्यायलेल्या मेंढ्यांच्या पिलांना दूध न मिळाल्याने वाढ खुंटते, पिले दगावतात. वजनेही कमी होतात. या आजारासाठी लागणारा उपचाराचा खर्चही जास्त असल्याने हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आजार आहे. कारणे हा जिवाणूजन्य आजार आहे. मुख्यत्वेकरुन मायकोप्लाझमा अगॅलेक्शियामुळे होतो.मायकोप्लाझमा प्रजातीच्या इतरही काही जिवाणूंचा संबंध या आजाराशी जोडला आहे. प्रसार
लक्षणे
निदान लक्षणांवरून तसेच आजारी जनावरांपासून गोळा केलेले दूध आणि सांध्यातील पाणी या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करून निश्चित निदान करता येते. प्रतिबंध आणि उपाययोजना
संपर्क : डॉ. विठ्ठल धायगुडे, ९०८२२९२३४१ (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.