Animal Care : उन्हाळ्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर जातं.काही जिल्ह्यांत हे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचतं.बहुतांश पशुपालकांकडे म्हशींसाठी गोठ्याची व्यवस्था नसते.त्यामुळे म्हशींना झाडाखाली किंवा कमी सावलीत तर कधी कधी उघड्या जागेत ठेवलं जातं. उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानाचा परिणाम म्हशीमध्ये लक्षणीय पद्धतीने जाणवतो. त्यामुळे म्हशीच्या आहारावर,आरोग्यावर तसचं प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम जाणवतो.
उन्हाळ्यातील वाढत तापमान,कोरडी हवा आणि आर्द्रतेचा म्हशीच्या आरोग्यावर अपायकारक परिणाम होतो. म्हशीचा रंग काळा आणि त्यांच्यात घाम ग्रंथी कमी असल्यामुळे त्यांना शरीरातील उष्णता उत्सर्जित करताना अडचणी येतात. म्हशी शारीरिक तापमान स्वनियंत्रीत करू शकत नाहीत आणि त्यामुळेच, म्हशींना उष्णतेचा त्रास होतो आणि त्याच्यांत ताण निर्माण होतो.
उष्णतेच्या ताणामुळे रेडीचे ऋतुचक्र विस्कळीत होतं आणि त्या उन्हाळ्यात माजावर येत नाहीत. त्यामुळेच,उन्हाळ्यातील काळ व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.
उन्हाळ्यात कमी प्रमाणात हिरवा चारा,खाद्य आणि योग्य निवाऱ्याची व्यवस्था नसल्यामुळे रेडीची शारीरिक वाढ खुंटते. प्रजनन क्रिया काही प्रमाणात विस्कळीत झल्याने भविष्यात मिळणाऱ्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.त्यासाठी
सुरवातीपासूनच रेडीचे योग्य व्यवस्थापन असल्यास प्रजनन लवकर कार्यान्वित होते. साधारणपणे पहिले वेत वयाच्या चौथ्या वर्षी होऊ शकते. काही कारणांनी रेडीचे पहिले वेत उशिरा होत असल्यास दैनंदिन व्यवस्थापन खर्चात नाहक वाढ होते.
वातावरणातील अति जास्त तापमान आणि आर्द्रता या घटकांचा रेडीच्या शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होत असल्याने शरीरातील संप्रेरकांच संतुलन बिघडून पहिल्यांदा उशिरा माजावर येतात, काही वेळेस गाभण रेडीचा गर्भपात होतो किंवा विल्यानंतरच्या समस्या उद्भवतात.
म्हशींतील या समस्यांवर उपाय करताना
वाढत्या उन्हात त्यांना योग्य प्रमाणात हिरवा चारा, प्रथिने असेलेलं पोषक खाद्य आणि चांगला हवेशीर निवारा उपलब्ध करुन द्यावा. त्यामुळे उष्णतेच्या ताणापासून म्हशींच संरक्षण होऊन त्यांची चांगली वाढ होते.
गोठ्यातच म्हशींना पुरेसं स्वच्छ, थंड पाणी आणि खाद्याची व्यवस्था ठेवावी यामुळे त्यांची शरीरक्रिया सुरळीत चालते.
म्हशींना सकाळी लवकर बाहेर चरायला सोडावं किंवा दुपारी ४ वाजेनंतर पुन्हा चरायला सोडावं. दुपारी त्यांच्या अंगावर ३ ते ४ वेळा थंड पाणी शींपडाव. मुक्त संचार गोठा जर असेल तर गोठ्यातील टाकीत कायम पाणी भरून ठेवावं.
म्हशी थंड वातावरण असताना वैरण योग्य रीतीने खातात. त्यामुळे या काळात म्हशींना पुरेशी वैरण द्यावी. प्रजननक्षम रेडीची योग्य देखभाल करावी. त्या माजावर येत आहेत का ? किंवा मुक्या माजाची लक्षणे दाखवितात का याकडे लक्ष ठेवावं.
गाभण रेड्यांना जास्तीची खनिज मिश्रणे आणि जीवनसत्वे नियमीत खाद्यातू द्यावीत. म्हशींमध्ये जर उष्माघाताची लक्षणे दिसून आली तर त्यांना थंड आणि शांत ठिकाणी बांधावं, थंड पाणी पाजावं. शरीरावर थंड पाणी शिंपडावं. आणि पशुवैद्यकाकडून उपचार करावेत. अशा प्रकारे वाढत्या उन्हात म्हशींची काळजी घेतल्यास म्हशींतील उष्णतेचा ताण कमी करता येतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.