Deworming in cow
Deworming in cow Agrowon
काळजी पशुधनाची

पावसाळ्यात जंत प्रादुर्भाव वाढतो?

Roshani Gole

वासराची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास त्यांना विविध आजारांची (animal disease) बाधा होत असते. पावसाळ्यात सर्वत्र हिरवे कोवळे गवत उगवून येत असते. या हिरव्या गवतावर अनेक कीटक बसेलेले असतात. जंताने बाधित जनावरांच्या शेणातून जंत (worms) जमिनीवर येत असतात. हे जंत नवीन उगवलेल्या गवताच्या पात्यावर येऊन बसतात. असे कोवळे गवत वासरांनी खाल्ल्यानंतर त्यांना जंताची बाधा होत असते.

जंत वासरांच्या आतड्यात वास्तव्य करून राहतात. आतड्यातील अन्नद्रव्याचे शोषण जंत स्वतःच्या वाढीसाठी करतात. त्यामुळे वासरांना शरीर वाढीसाठी पोषक घटक मिळत नाहीत. यासाठी वासरांचे वेळोवेळी जंतनिर्मुलन (deworming) करणे गरजेचं आहे.

जंत हे परजीवी असल्याने स्वतःच्या पालन-पोषणासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. जंत हे जनावरांच्या पोटातील, रक्त, स्त्राव, अन्नपदार्थ यांवर जगत असतात. वेळोवेळी जनावरांना जंताचे औषध न दिल्यास, पोटातील जंताची संख्या वाढत जाते.

लहान वयाच्या वासरांमध्ये जंताचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. जंताचा प्रादुर्भाव झाल्यास, आतड्यातील आम्लाचे स्त्रवन करणाऱ्या ग्रंथीचे कार्य थांबते. आम्लाचे प्रमाण ठराविक पातळीच्या खाली गेल्यास प्रथिनांचे पचन व्यवस्थित होत नाही. काहीवेळेस कालवडीना जंताचा प्रादुर्भाव झालेला असल्यास शरीराची योग्य वजनवाढ न झाल्याने, माजावर लवकर येत नाहीत.

मोठ्या जनावरांना तीन महिन्याच्या अंतराने आणि वासरांना दर महिन्याला, त्यांचे वय सहा महिने होईपर्यंत जंत निर्मुलन करावे. प्रभावी जंतनिर्मुलनासाठी गोठ्यातील सर्व जनावरांचे जंतनिर्मुलन एकाच वेळी करावे. जंतनिर्मुलन करताना वापरायचे औषध हे पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेचं द्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT