Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यामध्ये सप्टेंबरपासून एकवीसावी पशुगणना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. या वेळी सर्व प्रकारच्या पशुधनाची गणना प्रगणक व पर्यवेक्षक मोबाइलवरून करणार आहेत. यासाठी सध्या २०२ हून अधिक प्रगणकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. लवकरच पशुगणना सुरू होईल, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात विसाव्या पशुगणनेनुसार १४ लाख ३ हजार ६३३ जनावरांची संख्या आहे. दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते. यावर्षी एकविसावी पशुगणना केली जाणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तयारी देखील केली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाच्या गणनेसाठी २०२ प्रगणक व ३७ पर्यवेक्षक नेमले आहेत. यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. यांना मोबाइलद्वारे पशुधनाची गणना कशी करायची, याबाबत माहिती पुस्तिकाही देण्यात आली आहे.

यावर्षीची एकविसावी पशुगणना सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन आणि वेबपोर्टल तयार केले आहे. या डिजिटल पद्धतीचा वापर करूनच जिल्ह्यातील पशुधनाची गणना केली जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात गाय, म्हैस, मेंढी, शेळी अशी पशुगणना होणार आहे. डिसेंबरपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे

वास्तविक पाहता एक सप्टेंबरपासून ही पशुगणना सुरू होणे अपेक्षित होते. परंतु वरिष्ठ पातळीवरण पशुगणना करण्याचे आदेश मिळाले नसल्याने ही पशुगणना सुरू होण्यास विलंब लागत असल्याचे चित्र आहे. या आठवड्यात पशुगणना करण्याचे आदेश मिळतील, अशी शक्यता पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

विसाव्या पशुगणनेतील आकडेवारी

* गाय वर्ग ३,२४,७५६

* म्हैस वर्ग ४,९३,९९८

* मेंढी १,३०,७५४

* शेळी ४,५४,१२५

* एकूण १४,०३,६३३

जिल्ह्यात पशुधनाची जनगणना करण्यासाठी विभाग सज्ज झाला आहे. लवकरच पशूगणना सुरू होणार असून मोबाइल अॅपवरून करण्यात येणार आहे. सर्व माहिती अॅपवरच भरली जाणार आहे. टॅग नसलेल्या पशुंची माहिती प्रगणक पशुधन पर्यवेक्षकांना देतील.
- डॉ. अजय थोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, मिरज (सांगली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT