Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : शिराळ्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढतोय

Lumpy Skin Disease : मागील नऊ-दहा महिन्यांपूर्वी लम्पी स्कीन आजाराने थैमान घातले होते. त्या वेळी जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली होती.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

कोकरूड जि. सांगली ः शिराळा तालुक्यातील कोकरूड, बिळाशी, चिंचोली, मोरेवाडी, खुजगाव, मांगरूळ, रिळे, आदी वाडी-वस्त्यांवर जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढत आहे. पशुपालक चिंतेत आहेत. हा आजार संसर्गजन्य असल्याने यावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर या आजाराने जनावरे दगावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

मागील नऊ-दहा महिन्यांपूर्वी लम्पी स्कीन आजाराने थैमान घातले होते. त्या वेळी जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली होती. जनावरांच्या भरणाऱ्या बाजारावर स्थानिक खरेदी-विक्रीही बंद करण्यात आल्याने, तसेच पशुवैद्यकीय विभागाने गावोगावी तपासणी आणि लस टोचणी मोहीम सुरू केल्याने लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी झाला होता.

आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसतात, तसेच आजारावर नियंत्रण मिळाल्याची खात्री झाल्यावर प्रशासनाने जनावरांचे बाजार पूर्ववत सुरू केले. त्यामुळे जनावरांची खरेदी-विक्री सुरू झाली. यामुळे लस दिल्यानंतरही थोड्याफार प्रमाणात असणारा लम्पी स्कीन आजार पुन्हा बळावू लागला आहे. या आजाराने आता पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोकरूड परिसरातील गावातील जनावरांना संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

लसीकरण करावे

या जनावरांना चारा आणि पाणी स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे. लम्पी स्कीनची जनावरांना लागण झाल्यावर तत्काळ परिसरातील पशुवैधकीय विभागाला याबाबत माहिती दिली पाहिजे. सोबत बाधीत जनावरांना पशुवैद्यक दवाखान्यातील डॉक्टरना आणून उपचार करणे आवश्यक आहे. कोकरूड परिसरात लम्पी स्कीनचा विळखा वाढत असल्याने गोपालक चिंताग्रस्त झाले आहेत.

सध्या परिसरात सर्व गावांतील गोवर्ग जनावरांचे लसीकरण झालेले आहे. त्यातून कोणाच्या जनावरांचे लसीकरण राहिले असल्यास शेतकऱ्यांनी शासकीय पशुवैधकीय दवाखान्याकडून लसीकरण करून घ्यावे. लम्पी स्कीनसदृश आजार जनावरांमध्ये आढळल्यास त्वरित शेतकऱ्यांनी शासकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधून त्वरित उपचार करून घ्यावेत.

- डॉ. के. जी. माळी, पशुवैधकीय अधिकारी, कोकरूड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT