Animal Care  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : फायदेशीर पशुपालनासाठी शाश्वत जंतनियंत्रणाची गरज

Animal Husbandry : पशुपालन व्यवसाय यशस्वी आणि फायदेशीर करावयाचा असेल, तर शाश्‍वत जंतनियंत्रण आवश्यक आहे, असे मत नागपूरच्या महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे (माफसू) कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Latur News : पशुपालन व्यवसाय यशस्वी आणि फायदेशीर करावयाचा असेल, तर शाश्‍वत जंतनियंत्रण आवश्यक आहे, असे मत नागपूरच्या महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे (माफसू) कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी व्यक्त केले. उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी (ता. २८) आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते.

भारतीय पशुवैद्यकीय परजीवीशास्त्र संघटनेच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त संघटना व माफसूच्या वतीने या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. पाटील म्हणाले, की जंत नियंत्रण हे पशुपालन व्यवसायासमोरील मोठे आव्हान आहे.

या परिसंवादातून जंतनिर्मूलनासाठी काहीतरी ठोस उपाय योजना समोर यावी अशी आशा व्यक्त केली. सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणातून परिसंवादाचा हेतू विशद करत यशस्वी व किफायतशीर पशुपालन व्यवसायात जंतनिर्मूलनाचे महत्त्व अधोरेखित केले.

जम्मू येथील अधिष्ठाता प्रा. डॉ. राजेश कटोच यांनी पशुतील जंतप्रादुर्भावामुळे होणारे आजार आणि आर्थिक नुकसानीवर प्रकाश टाकला. तसेच संतुलित पशुआहार, उत्तम व्यवस्थापन आणि स्वच्छता यातून मोठ्या प्रमाणात जंतप्रादुर्भावावर नियंत्रण मिळवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळू शकतो, असे सांगत जंत प्रादुर्भावच्या आधुनिक संशोधनाबद्दल मार्गदर्शन केले. या ऑनलाइन परिसंवादास देशभरातून सुमारे दीडशेहून अधिक शास्त्रज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या परिसंवादाचे उद्‍घाटक म्हणून मा. डॉ. नितीन पाटील, कुलगुरू, माफसू, नागपूर हे ऑनलाइन उपस्थित होते. परिसंवादात भारतीय पशुवैद्यकीय परजीवीशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. ए. संगरन (चेन्नई) व सचिव डॉ. अनिश यादव (जम्मू) सहभागी झाले होते. संघटनेचे प्रदेशसचिव प्रा. डॉ. गोपाळ भारकड यांनी प्रास्ताविक केले.

सूत्रसंचालन डॉ. मत्स्यगंधा पाटील यांनी केले, तर डॉ. अशोक भोसले यांनी आभार मानले. केले. परिसंवादासाठी डॉ. अनिल पाटील, डॉ. संजय धावारे, डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. अशोक देवांगरे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT