Animal Care : पाच आजारामुळे गाय, म्हशी गाभण राहत नाहीत? ओळखा लक्षणे

Team Agrowon

प्रजनन संस्थेचे आजार

मादी जनावरांमध्ये प्रजनन संस्थेचे अनेक आजार होतात. ते आजार लवकर लक्षात येत नाहीत. त्यामुळे बर्‍याचदा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.

Animal Care | Agrowon

पशुवैद्यकाच्या साह्याने उपचार

महागडा औषधोपचार करूनही हे आजार पूर्णपणे बरे होत नाहीत. त्यामुळे अशा आजारांची लक्षणे ओळखून पशुवैद्यकाच्या साह्याने उपचार करणे गरजेचे असते.

Animal Care | Agrowon

गर्भाशयाचा दाह

गर्भाशयातून पू येणे त्याचा कुजट वास येणे. गर्भाशय मोठे व मऊ होणे. वार पूर्णपणे न पडणे व गाय वारंवार उलटणे.

Animal Care | Agrowon

इन्फेक्शीयस बोवाईन रिनोट्रायकीयासीस

एकाकी ताप चढणे, नाकातून चिकट स्त्राव येणे, ढासने, योनीमार्गात पूवाच्या गाठी तयार होणे. डोळे लाल होणे. गर्भपात होणे. वारंवार उलटणे.

Animal Care | Agrowon

व्हीब्रीओसीस

चार ते पाच महिन्याचा गर्भपात होणे. वारंवार उलटणे, गाभ उशिरा धरणे. माज न दाखविणे.

Animal Care | Agrowon

लेप्टोस्पायरोसीस

एकाएकी ताप चढणे. भूक मंदावणे. कोणत्याही कालावधीत गर्भपात होणे. तांबडी लघवी होणे. अशक्तपणा जाणवणे. चिकट दूध येणे.

Animal Care

ब्रुसोलोसीस

६ ते ७ महिन्याचा गर्भपात होणे. वार व्यवस्थित न पडणे, वारंवार उलटणे, गर्भाशयाचा दाह वाढणे.

Animal Care | Agrowon

ट्रायकोमोनीओसीस

२ ते ३ महिन्याचा गर्भपात होणे, गर्भाशयाचा दाह होऊ पु तयार होणे. अनियमित माज दाखविणे, वारंवार उलटणे.

Animal Care | Agrowon

Animal Heat Stress : मानसांप्रमाणे जनावरांसाठीही वाढत तापमान घातक ; ही आहेत जनावरांतील उष्माघाताची लक्षणे

आणखी पाहा...