Animal care  Agrowon
काळजी पशुधनाची

Cow Rearing : शबरीच्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी निकृष्ट गायी नाकारल्या

Shabari Mahamandal : संयुक्त दायित्व गट स्थापन करून लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे पालन करणे ही केंद्रीय योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Nashik News : संयुक्त दायित्व गट स्थापन करून लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे पालन करणे ही केंद्रीय योजना राज्यात राबविण्यात येत आहे.या योजनेसाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ ही नोडल एजन्सी असून सूमुल संस्थेच्या अधिकृत व्यापाऱ्यांमार्फत गायी लाभार्थ्यांना देण्यात येतात.

मात्र, खरेदीसाठी निकृष्ट दर्जाच्या गायी आणण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यावर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या गायी नाकारल्या असून व्यापारी बदलण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

योजनेअंतर्गत गाई खरेदी व दूध खरेदी यासाठी शबरी महामंडळ व सुमुल डेअरी यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे. दुधाळ गाई खरेदी करण्यासाठी सुमूल डेअरीच्या अधिकृत व्यापाऱ्यांकडून गाई लाभार्थ्यांना देण्यात येतात.

बुधवार (ता. २९) रोजी शबरी महामंडळ नाशिक शाखा व्यवस्थापक मोनाली शिंदे आणि पशुधन व दुग्धविकास तज्ञ डॉ संगमेश्वर पांचाळ यांनी दुधाळ जनावरे खरेदीसाठी गुजरातमधील धरमपुर व बाज गावात भरविण्यात आलेल्या दुधाळ जनावरे बाजाराला भेटी दिल्या.

यावेळी लाभार्थ्यांसाठी आणलेल्या गायींची गुणवत्ता योग्य नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे शाखा व्यवस्थापक आणि तज्ञ डॉक्टरांतर्फे या गायी नाकारण्यात आल्या.

सुरगाणा तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी गायी पुरवठा करण्यात येणार होता. मात्र ज्या व्यापाऱ्यांनी चांगल्या जनावरांचा पुरवठा केला नसल्याने सुमुल डेअरी यांना महामंडळाने पत्राद्वारे व्यापारी बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

जनावरे खरेदीप्रसंगी लाभार्थ्यांनी स्वतः उपस्थित रहावे. योग्य तपासणी करूनच जनावरे खरेदी करावीत. गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड करू नये.
- लीना बनसोड, व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT