Animal Care : अशी ओळखा टोकदार वस्तू, खिळे खाल्लेल्या जनावरांची लक्षणे

Team Agrowon

रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये जिभेच्या चवग्रंथी विकसित नसल्यामुळे त्यांना खाद्य आणि अखाद्य वस्तूची चव ओळखता येत नाही. अशा वेळी जनावरे अखाद्य वस्तू खातात.

Animal Care | Agrowon

अखाद्य वस्तूंचा प्रकार आणि शरीरातील त्या अवयवावर लक्षणे अवलंबून असतात.

Animal Care | Agrowon

अखाद्य वस्तूंचा प्रकार आणि शरीरातील त्या अवयवावर लक्षणे अवलंबून असतात.

Animal Care | Agrowon

टोकदार वस्तू तोंडामध्ये अडकल्यास चावताना तोंडामध्ये जखमा होऊन रक्तयुक्त लाळ गळते.

Animal Care | Agrowon

चेंडू, बटाटे, आंब्याची कोय, मासे पकडण्याचा गळ अन्ननलिकेत अडकल्यास अन्न पुढे न जाता परत गळते. हे लवकर नाही काढल्यास जनावराचे पोट फुगून मरण पावते.

Animal Care | Agrowon

रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटाचे चार भाग असतात. त्यातील दुसऱ्या भागाची रचना अशी असते की त्यामध्ये अखाद्य वस्तू अडकतात. जर वस्तू टोकदार असेल तर त्या ठिकाणी इजा होते.

Animal Care | Agrowon

गाभण परिस्थितील जनावरांमध्ये पोटाचा दाब वाढल्यास त्या टोकदार वस्तू अवयवाला छेदून बाहेर निघतात. त्या छातीच्या पडद्याला भेदतात. तेथे हर्निया होऊ शकतो. त्यामुळे जनावरास श्‍वास घ्यायला त्रास होतो.

Animal Care
आणखी पाहा....