Lumpy Vaccine Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Vaccine : ‘लम्पी स्कीन’वरील लसीकरणासाठी ३१० खासगी सेवादात्यांची सेवा

आजाराचा प्रादुर्भाव जलद गतीने व प्रभावीपणे रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी ३१० खासगी सेवादात्यांची सेवा अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले

टीम ॲग्रोवन

सांगली ः जिल्ह्यातील जनावरांमध्ये पसरणाऱ्या लम्पी स्कीन (Lumpy skin Disease)या त्वचा आजाराचा प्रादुर्भाव जलद गतीने व प्रभावीपणे रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण (Lumpy Vaccination) करण्यात येत आहे. यासाठी ३१० खासगी सेवादात्यांची सेवा अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी (DR. Raja Dayanidhi) यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी म्हणाले,

की सांगली जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याकामी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. परंतु अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याने खासगी सेवादाता यांच्या सेवा अधिग्रहीत करणे आवश्यक आहे.

त्यानुसार प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक आजारास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर केला जाणार आहे.

उपाययोजनेसाठी जिल्ह्यातील ३१० खासगी सेवादाता यांच्या सेवा विविध पशुवैद्यकीय दवाखान्यांत अधिग्रहीत करण्यात आली आहे. खासगी सेवादाता यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांच्या नियंत्रणाखाली कामकाज करणे अपेक्षित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Season : रब्बी विकसित कृषी संकल्प अभियानावर तज्ज्ञांचा बहिष्कार

Farmer Study Tour : शेतकरी परदेश अभ्यास दौऱ्याचे अनुदान वाढवा

Cabinet Meeting Maharashtra : यंदा तरी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात घ्या

Sugarcane Farming : राज्यात सलग पावसामुळे ऊसपट्ट्यावर संकटाची छाया

Farmers Protest : कापूस उत्पादकासाठी उभारणार लढा

SCROLL FOR NEXT