Fodder Camp Agrowon
काळजी पशुधनाची

Fodder Camp Pune : जुन्नरच्या पाच गावांचे चारा छावणीसाठी प्रस्ताव

Fodder Shortage : जिल्ह्यात पावसाने मोठी दडी मारल्याने शेतीसह पाण्याचा आणि चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यात पावसाने मोठी दडी मारल्याने शेतीसह पाण्याचा आणि चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात पुरंदर, बारामती, जुन्नर, खेड, शिरूर आदी तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांकडून चारा छावणीची मागणी सुरू होती.

जिल्ह्यातून सध्या जुन्नर तालुक्यातील पाच गावांमध्ये चारा छावणी सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. मान्यतेसाठी हे प्रस्ताव विभागीय आयुक्तालयाकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आली.

जिल्ह्यात खरीप हंगामात हवेली, पुरंदर, बारामती, इंदापूर, जुन्नर, शिरूर व दौंड तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पाऊस झालेला नाही. यामुळे या तालुक्यांमध्ये खरीप धोक्यात आला असून, पाणी आणि चाराटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर चारा छावण्या सुरू करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

पुरंदर, हवेली आणि बारामती तालुक्यांत आत्तापर्यंत ४० ते ४२ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे. त्यामुळे येथे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाकडे जुन्नर तालुक्यातून प्रस्ताव आले आहेत.

यात आणे पठार, शिंदेवाडी, आनंदवाडी, पेमदरा, नळावणे या पाच गावांचा समावेश प्रस्ताव विभागीय आयुक्तालयाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, आंबेगाव, पुरंदर, बारामती, शिरूर या तालुक्यांमधून चारा डेपो सुरू करण्याची मागणी करणारे प्रस्ताव येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत या तालुक्यांतून कोणतेही प्रस्ताव अद्याप प्रशासनाला दाखल झाले नाहीत. मात्र याही तालुक्यांमध्ये चारा छावण्या सुरू होण्याच्या शक्यतेने तयारी सुरू केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चारा छावण्यांवर लम्पी स्कीनचे संकट

जिल्ह्यात पावसाअभावी पिके आणि पशुधन संकटात आले असताना चारा छावणी सुरू करताना लम्पी स्किन रोगांचे संकट देखील आहे. चारा छावणी सुरू करताना, सर्व पशुधनांचे लसीकरण करून त्यांना एकत्रित ठेवावे लागणार आहे. तर आजारी, दुधाळ पशुधन छावणीत ठेवले जाऊ नये यासाठी थेट गोठ्यातच चारा उपलब्ध व्हावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT