MAFSU Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : ‘माफसू’चा ‘पशुपालक प्रथम’ उपक्रम सुरू

MAFSU : हवामान बदलामुळे शेतीमध्ये अनेक प्रश्न तयार झाले आहेत. मात्र या काळातही शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला पशूपालनाने चांगली साथ दिली आहे.

अमित गद्रे

Pune News : ‘‘हवामान बदलामुळे शेतीमध्ये अनेक प्रश्न तयार झाले आहेत. मात्र या काळातही शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला पशूपालनाने चांगली साथ दिली आहे. दरवर्षी या क्षेत्रामध्ये सातत्याने वाढ होत आहे. गाई, म्हशी संगोपनाच्या बरोबरीने कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, दूध प्रक्रिया उद्योग आणि शेततळ्यातील मत्स्यपालनातून चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्नवाढीची संधी आहे.

हेच उद्योग ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारे असल्याने महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने ‘पशुपालक प्रथम’ या उपक्रमाला राज्यभर गती देण्याचे ठरविले आहे,’’ अशी माहिती कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी दिली.

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘शेती, फलोत्पादनातील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काही वर्षांपूर्वी भारतीय कृषी संशोधन परिषदेने देशभरात ‘शेतकरी प्रथम’ या उपक्रमाला सुरवात केली.

याद्वारे कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र तसेच संबंधित राज्यांतील पीकनिहाय प्रयोगशील शेतकऱ्यांच्या एकत्रिकरणातून तंत्रज्ञान प्रसार चांगल्या पद्धतीने झाला. गेल्या काही वर्षांत शेतीबरोबर पूरक उद्योगाने आघाडी घेतली आहे. हे लक्षात घेऊन आम्ही ‘पशुपालक प्रथम’ उपक्रम सुरू करत आहोत.

गाय, म्हैस, कोंबडी, शेळी, मेंढीपालन, चारा लागवड, लसीकरण, पशूखाद्य निर्मिती, मधमाशीपालन, दूध, मांस आणि अंडी प्रक्रिया तसेच मत्स्यपालनातील देशभरातील संशोधन संस्थांनी विकसित केलेले तंत्रज्ञान सामान्य पशूपालकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन झाले आहे. एकात्मिक शेती आणि पशुपालन पद्धतीचे मॉडेल तयार करत आहोत. यातून ग्रामीण भागातील चक्रीय अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न आहे.’’

असा आहे ‘पशुपालक प्रथम’ उपक्रम

- ‘माफसू‘ सोबत देशभरातील पशू संशोधन संस्था, पशुसंवर्धन विभाग तसेच राज्यातील चार कृषी विद्यापीठे, ५० कृषी विज्ञान केंद्र आणि प्रयोगशील पशूपालकांचा समन्वय

- प्रत्येक जिल्ह्यात पशुपालक- शास्त्रज्ञ मंचातून तंत्रज्ञान प्रसाराला गती

- पशुवैद्यकीय महाविद्यालयात एकात्मिक पशुपालन ‘मॉडेल फार्म'मध्ये प्रशिक्षणाची सोय

- जातिवंत पैदाशीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रशिक्षण

- पशुपालनासोबत प्रक्रिया, मूल्यवर्धनासाठी लघू उद्योग प्रशिक्षण

- जमीन सुपीकतेसाठी शेण, गोमूत्र, पोल्ट्री, फिश वेस्ट आदी घटकांपासून खत निर्मितीचे प्रशिक्षण

- चारा बॅंक तसेच चारा प्रक्रिया, फॉडर ब्लॉक, संपूर्ण आहार, मूरघास निर्मिती उद्योगाला चालना

- कृषी-वानिकी, वनशेती, झाडपाल्यासाठी वृक्ष लागवडीचा प्रसार, फळबागेत चारा लागवडीवर भर

- पशू उपचारात औषधी वनस्पतींच्या वापराला चालना

- तंत्रज्ञान प्रसाराला माहिती तंत्रज्ञानाची जोड

‘सामुहिक पशूपालनाला चालना’

‘‘गेल्या दोन वर्षांपासून माफसू आणि राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाद्वारे नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांत सूक्ष्म प्रशिक्षण केंद्राकडून ७४ प्रशिक्षणे झाली आहेत. या केंद्रामधून सुमारे १,७८० पशुपालकांनी प्रशिक्षण घेतले आहे. हे पशुपालक त्यांच्या गावातील पशूपालकांपर्यंत नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करत आहेत.

याच पद्धतीने पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या कार्यक्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर पाच गावांतील प्रयोगशील पशुपालकांचा एक गट तयार करून तंत्रज्ञान प्रसाराला चालना देण्यात येईल. याचे नियोजन पशुपालक- शास्त्रज्ञ मंचाद्वारे केले जाईल,’’ अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT