Livestock Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Health : शेळ्या-मेंढ्यांतील नोझल बॉट

Team Agrowon

डॉ. मीरा साखरे, डॉ. ऊर्मिला वाकडे

Veterinary Treatment : मेंढी आणि शेळ्यांच्या नाकात होणाऱ्या अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकता आणि वाढीवर गंभीर परिणाम होतो. क्वचित या अळ्या नाकातून मेंदूकडे जातात आणि मज्जातंतू बाधित झाल्यामुळे प्राण्यात तोल जाणे, चक्कर येणे, गोल फिरणे ही लक्षणे दिसतात.हे लक्षात घेऊन शेळ्या, मेंढ्यांच्या आरोग्याची काळजी आणि गोठ्याची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.

पावसाळ्यामध्ये गवत, ओली माती, गोठ्याच्या आसपास ओल्या जागेवर माशी, कीटकांचे प्रमाण वाढते. कीटक, गोचीड, आंतरपरजीवी आणि चावणाऱ्या माशांमुळे शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये पावसाळ्यात अनेक आजार होतात. वातावरणातील हे सर्व घटक प्राण्यांच्या शरीरावर कमी अधिक प्रमाणात परिणाम करतात.

शेळी, मेंढीच्या नाकाच्या पोकळीत इस्ट्रस ओवीस माशीच्या प्रादुर्भावामुळे अळ्या होतात. या आजारास नोझल बॉट म्हणतात. मेंढी आणि शेळ्यांच्या नाकात होणाऱ्या अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे त्यांची उत्पादकता आणि वाढीवर गंभीर परिणाम होतो. क्वचित या अळ्या नाकातून मेंदूकडे जातात आणि मज्जातंतू बाधित झाल्यामुळे प्राण्यात तोल जाणे, चक्कर येणे, डोके आपटणे, गोल फिरणे ही लक्षणे दिसतात. मेंढ्यांमध्ये या परजीवीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.

माशांचा जीवनक्रम

प्रौढ माशी काळ्या तपकिरी रंगाची असते, एक सेंटीमीटर लांब असते.

समशीतोष्ण भागात वर्षाला एक किंवा दोन पिढ्या तयार होतात उष्ण भागात पिढ्या पूर्ण होतात.

अळी पांढरी-पिवळ्या रंगाची असते, परिपक्व झाल्यानंतर अळ्या हलक्या क्रिम रंगाच्या दिसतात, त्यावर गडद पट्ट्या दिसतात.

परिपक्व अळ्यांच्या खालच्या भागात लहान काट्यांसारख्या रेषा असतात.

अळी वाढीसाठी नाकातील उतीच्या चिकट स्त्रावावर अवलंबून असते.

पूर्ण वाढ झालेल्या आळ्या शिंकल्यानंतर बाहेर पडून मातीमध्ये राहतात.

माशा शेळ्या,मेंढ्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात राहतात आणि तिथे आपले अस्तित्व टिकवतात.

नाकामध्ये प्रादुर्भाव

गाभण माशी मेंढ्याच्या नाकाभोवती घोंगावते, ही माशी अंडी नाकाच्या पोकळीत सोडून जातात.

अळ्या एक ते दहा महिने स्थिर अवस्थेत नाकाच्या पोकळीत राहतात. परिपक्व झाल्यानंतर नाकातून बाहेर येतात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या मातीत पडल्यानंतर तीन ते नऊ आठवड्यांनी माशीमध्ये रूपांतर होते.

हे चक्र या माशा गाभण झाल्यानंतर सुरू होते.

आजाराचा संसर्ग

माशांच्या प्रादुर्भावामुळे मेंढ्यांची चरण्याची क्षमता कमी होते. अळीमुळे नाकाच्या पोकळीतील सगळ्यात वरच्या उतीचा ऱ्हास व्हायला सुरवात होते.

नासिकेच्या उतींचा ऱ्हास तसेच पेशींचा मृत्यू अळ्यांच्या पोटाच्या म्हणजे खालच्या भागावर असलेल्या टोचणाऱ्या काट्यांमुळे होतो.

नासिकेच्या पोकळीतील भिंतीच्या ऱ्हासामुळे नाकातून पुसारखा चिकट स्त्राव बाहेर येतो.

चिकटपणामुळे नाकपुड्या माती आणि धुळीने माखलेल्या दिसतात.

लक्षणे

सुरवातीच्या संसर्ग काळात नाकाच्या पोकळीत सूज आल्यामुळे चिकट पांढरा- पिवळसर स्त्राव बाहेर पडतो. परिपक्व अळी नाकाच्या पोकळीत हालचाल करू लागल्यावर मेंढ्यांच्या नाकात सुरवातीला पाण्यासारखा आणि नंतर पू सारखा स्त्राव तयार होतो.

मोठ्या अळ्यांच्या हालचालींमुळे मेंढ्या शिंकतात. अशा अस्थिर हालचालींमुळे मेंढ्यांचे चरण्याकडे दुर्लक्ष होते, मेंढ्या कमी चारा खातात.

मेंढ्याच्या नाकावर माशा त्यांच्या अळ्या ठेवण्याचे प्रयत्न करतात, ते टाळण्यासाठी प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळतात, शिंकतात, डोके हलवतात, नाक जमिनीजवळ नेतात.

दिवसा उष्णतेच्या वेळी माशा जास्त सक्रिय असतात, त्यामुळे सर्व मेंढ्या एकत्र येऊन डोकेमध्ये ठेवून गोलाकार वर्तुळ बनवून थांबतात.

अळ्यांच्या अडथळ्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

निदान

मेंढ्याभोवती माशांचा वाढत्या वावरामुळे मेंढ्या चलबिचल होतात. त्यांच्या वागण्यात बदल दिसून येतो. नाकातील स्त्राव, शिंकणे, नाकातून अळी पडणे यावरून प्राथमिक अंदाज लावता येतो.

नाकातील स्त्राव जास्त असेल तर रक्तामधील इओसिनोफिल पेशींची संख्या वाढते.

प्रतिबंधक उपाययोजना

लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकांकडून योग्य उपचार करून घ्यावेत. माशांचे नियंत्रण करावे.

गोठा व कुरणे स्वच्छ ठेवावीत. वेळोवेळी मेंढ्यांची तपासणी करावी.

गोठा नेहमी कोरडा ठेवावा यामुळे वाढणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव नियंत्रणात रहातो.

गोठ्या भोवतालच्या परिसराची स्वच्छता ठेवावी.जंत निर्मूलन करावे. परिसरातील माशा, कीटक, डास यांचे योग्य नियंत्रण करावे.

डॉ. मीरा साखरे, ९४२३७५९४९०

(सहायक प्राध्यापिका, पशुऔषध वैद्यकशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nuksan Bharpai : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा; राज्य सरकारने दिली २३७ कोटींच्या मदत निधीला मंजुरी

Water Projects : चाळीसगावातील नऊ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

Sugar Factory : ‘वसाका’ वार्षिक भाडेकराराने चालवणार

Revenue Department : दीडशे गावांची जबाबदारी अवघ्या १२ तलाठ्यांवर

Water Scarcity : टॅंकरला विश्रांती, पण टंचाईचे ढग कायम

SCROLL FOR NEXT