Caravan Dog Agrowon
काळजी पशुधनाची

Caravan Dog : शेतकऱ्यांना मिळणार संरक्षक कारवान श्‍वान

Indian Dog Breed : कारवान श्‍वानासंदर्भाने माहिती देताना डॉ. जी. आर. चन्ना यांनी सांगितले की, कारवानचा वंशज हे साळुंकी जातीचे श्‍वान आहेत, जे इजिप्त, अरबस्तान, पॅलेस्टिनी, सीरिया, मेसोपोटेमिया, अनातोलिया आणि पर्शिया या भागातील आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : राजेशाही काळात युद्धात वापर झालेल्या कारवान या अवर्णीत श्‍वानाला ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व पशुसंवर्धन विभाग यांच्या माध्यमातून होत आहे.

‘माफसू’चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे, विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने, डॉ. सुधीर राजूरकर व डॉ. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनात या श्‍वानाच्या संदर्भाने माहिती संकलनाचे काम होती घेण्यात आले आहे.

कारवान श्‍वानासंदर्भाने माहिती देताना डॉ. जी. आर. चन्ना यांनी सांगितले की, कारवानचा वंशज हे साळुंकी जातीचे श्‍वान आहेत, जे इजिप्त, अरबस्तान, पॅलेस्टिनी, सीरिया, मेसोपोटेमिया, अनातोलिया आणि पर्शिया या भागातील आहेत. इतिहासानुसार पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात मुघल व मराठा यांच्यातील युद्धा दरम्यान जेव्हा मुघलांना यश मिळत नव्हते. तेव्हा मुघल सम्राटांनी अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणात बोलावलेल्या लष्कराच्या ताफ्यासोबत कारवान जातीचे श्‍वान आणले. त्यानंतर त्यांना कारवान असे नाव पडले.

पूर्वीपासून राजे, रजवाडे आणि शेतकरी या जातीच्या श्वानांचे संगोपन आणि संवर्धन करीत होते. चपळ, सहनशक्‍ती खूप, शांत, धाडसी, अलर्ट अशी अनेक वैशिष्ट्ये या श्‍वानाशी निगडीत आहेत. राष्ट्रीय पशू आनुवंशिक संशोधन ब्यूरो (कर्नाल, हरियाणा) येथे या श्‍वानाच्या नोंदणी प्रस्ताव दाखल केला आहे, असे डॉ. डॉ. चन्ना यांनी सांगितले. कारवान श्‍वानाच्या या संशोधन कार्यात डॉ. प्राजक्‍ता जाधव, डॉ. विलास डोंगरे, डॉ. महेश चोपडे, डॉ. एस. साजीद अली, डॉ. महेश दिघे यांचेही योगदान आहे.

कारवानची वैशिष्ट्ये

- नराचे वजन ः १९ ते २० किलो

- उंची ः ६९ ते ७० सेंटिमीटर

- लांबी ः ५६ ते ५८ सेंटिमीटर

- कमी वजन, जास्त उंची व लांबीमुळे कारवान श्‍वान हे अतिशय चपळ व वेगवान असते.

- कारवान जातीचे नर पिल्लू ९००० ते २५००० रुपये पर्यंत तर मादी पिल्लू ६००० ते १८००० रुपये पर्यंत विकल्या जाते.

- २००८ या वर्षातील लातूर गॅझेटमध्ये कारवान श्‍वानाचा १९२५ पासून शिकारीसाठी उपयोग होत असल्याच्या नोंदी आहेत.

महाराष्ट्रातील पाटील घराणे, श्‍याम बरुरे, जोशी, देशपांडे, कासले, जाधव, तेरखेडे, कदम, बघाटे, खरात, निंबाळकर, चव्हाण, चौरसिया, खांडेकर, जांभळे, भारती, घोडके, डोंगरे, चौरे, सोनवणे, शेळके, माने, बारंगुळे, श्रीराम, चोरमले या श्वानप्रेमीचा महाराष्ट्रातील या श्वान जातींच्या संवर्धनात मोठा वाटा आहे.
- डॉ. जी. आर. चन्ना, पशू तज्ज्ञ. मो. ७७१०८३३३०९
विदेशी जातीचे श्‍वान १० ते २० किलोमीटर पळाल्यास त्यांना दम लागण्याचा किंवा अटॅकचा धोका राहतो. परंतु कारवान एका ब्रेकनंतर दिवसभरात ३० ते ४० किलोमीटर पळतात. ३० ते ३५ किलोमीटर प्रति तास असा यांचा वेग आहे. यांना घरी पाळल्यास फरशी किंवा टाइल्सवर यांचे पाय वाकडे होतात. परिणामी घरी जास्त काळजी घ्यावी लागते, परिणामी शेतातच मोकळे ठेवले तर चांगले.
- शाम बरुरे, प्राणी अभ्यासक, हरंगुळ, लातूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Irrigation Project: खानदेशातील सिंचन प्रकल्प रखडले

Revenue Day: महसूलच्या अधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते गौरव

Encroachment Free Vanpuri: पुरंदर तालुक्यातील ‘वनपुरी’ ठरले पथदर्शी

ZP School Success: साखराच्या जि.प. शाळेचा प्रेरक प्रवास

PM Kisan: किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी

SCROLL FOR NEXT